(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Shivsena : संजय राऊत नाशिक दौऱ्यावर, 'या' पन्नास पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र?
Nashik Shivsena : संजय राऊत नाशिक दौऱ्यावर येत असताना पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला राम राम केला आहे.
Nashik Shivsena : नाशिकमध्ये (Nashik) ठाकरे गटाला (Thackeray Sena) पुन्हा एकदा धक्का बसला असून जवळपास पन्नास शिवसैनिकांनी (Shivsanik) ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची (Shinde Sena) वाट धरली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत (sanjay Raut) नाशिक दौऱ्यावर येत असताना पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला राम राम केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक हा शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आजच्या घडीला असंख्य कार्यकर्त्यानी शिंदे गटात प्रवेश केल्याने अवस्था बिकट झाली आहे. हेच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. तत्पूर्वीच पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळेच शिंदे गटाकडून ठाकरे गटाला नवीन भगदाड पडले आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. हे पन्नास पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणार प्रवेश होणार आहे.
संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला शिंदे गटाने मोठा धक्का दिला आहे. नाशिकचे जवळपास 50 पदाधिकारी कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. संजय राऊत आज दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. या आधीही राऊतांची पाठ फिरताच 12 माजी नगरसेविकांनी शिंदें गटात प्रवेश केला होता. डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे. नाशिक ठाकरे गटाशी सख्य राखून असलेले संजय राऊत यांनी पदाधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन डॅमेज कंट्रोल रोखले. मात्र संजय राऊत माघारी फिरताच मोठा बॉम्ब फुटला. अनेक विश्वासू पदाधिकारी शिंदे गटात गेले. त्यानंतर आज पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे नियोजन करण्यासाठी राऊत नाशिक दौऱ्यावर येत असून अशातच पन्नास पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशकातील राजकीय घडामोडींना वेग आला असून नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटातील मोठा गट फोडण्यात शिंदे गटाला अखेर यश आल्याचे म्हटलं जात आहे.
या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश
योगेश बेलदार, अनिल साळुंखे, बापू लहुजी ताकटे, शिवा ताकाटे, अमोल सूर्यवंशी, योगेश चव्हाणके, प्रमोद लासुरे, रुपेश पालकर, संदेश लवटे, नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहाके, विनोद मुंगसे, शैलेश कारले, प्रसाद तांबट, प्रशांत आव्हाड, महेश जोशी, राहुल देशमुख, प्रशांत गाडगे, प्रशांत निकम, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, अमित कटक, प्रमोद कालेकर, योगेश धामणकर, गोकुळ मते, विलास खैरनार, बाळू बोबरे, दर्शन काळे, राकेश मोरे, मोहित वराडे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, गणेश परदेशी, राहुल रंधरे, अमोल बराटे, अनिल निर्भवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद भटकळ, उमेश गोणार, धीरज कडाळे, अमेय जाधव, गणपत मेनू, लक्ष्मण पाटील, मनोज उदावंत, अनिल नागरे, संदीप कदम, रवींद्र पेहरकर, पंकज भालेराव, अनिल शिंदे, संजय गवळी, योगेश सावकार, अभिजीत तागड इत्यादी पदाधिकारी प्रवेश शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.