Nashik News:नाशिककरांना दिलासा! नांदगाव रेल्वे स्थानकात तीन प्रवासी गाड्यांना पूर्ववत थांबा, 8 एप्रिलपासून गाड्या पूर्ववत थांबणार
Nashik News: नाशिकमधील नांदगाव रेल्वे स्थानकावरील तीन एक्स्प्रेसचा थांबा पूर्ववत करण्यात आला आहे.

Nashik News: नाशिकमधील (Nashik) नांदगाव तालुक्यातील (Nandgaon) प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. नांदगाव येथे जनता (Janta Express), गोरखपूर कुशीनगर (Gorkhapur Kushinagar Express) व कामयानी एक्सप्रेस (Kamyani Express) या गाड्यांचा थांबा मंजूर करण्यात आला असून 8 एप्रिल पासून ती सेवा पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी दिली आहे.
कोरोना काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने रद्द केलेल्या नांदगाव रेल्वे स्थानकातील तीन एक्सप्रेसचे थांबे पूर्ववत सुरू होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कोरोना काळात कामायनी , कुशीनगर व जनता एक्सप्रेस या तीन गाड्यांचे थांबे काढून घेण्यात आल्याने नांदगाव येथून नाशिक, मुंबईला जाणा-या प्रवाशांचे मोठे हाल होत होते. अखेर तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या प्रयत्नाने पुन्हा रेल्वे मंत्र्यांनी या तीन गाड्यांना थांबा देण्याच मान्य केले आहे. येत्या 8 एप्रिल पासून या तिन्ही गाड्या आता नांदगाव रेल्वे स्थानकात पूर्ववत थांबणार असल्याने नांदगावकरांनी रेल्वे प्रशासनाचे स्वागत केले आहे...
कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात रेल्वे प्रशासनाने अनेक रेल्वे गाड्यांचे थांबे रद्द केले होते. त्यात जनता, गोरखपूर कुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा रद्दचा समावेश होता. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय विचारात घेऊन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे जनता, गोरखपूर खुशीनगर व कामयानी एक्सप्रेस या गाड्यांचा नांदगाव येथील थांबा मंजूर करण्याबाबत मागणी केली होती. त्यावर केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन रेल्वे प्रशासनास सदरच्या रेल्वे गाड्यांचे थांबे पूर्ववत करण्यासाठी आदेश दिले. त्यानुसार दिल्ली रेल्वे बोर्डाने यांनी त्याबाबतचे आदेश निर्गमित केले असून 8 एप्रिल 2023 पासून या थांब्यांवर वरील रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे.
पाटणा लोकमान्य टिळक जनता एक्सप्रेस, लोकमान्य टिळक बनारस कामायनी एक्सप्रेस व लोकमान्य टिळक गोरखपुर कुशीनगर एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचे नांदगाव येथील थांबे रद्द केल्याने नियमितपणे रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेवून कोरोना काळात नांदगाव येथील रद्द करण्यात आलेले रेल्वे थांबे 8 एप्रिल पासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
