एक्स्प्लोर
विरार स्टेशनवर लोकलमध्येच बाळाचा जन्म
विरार स्टेशनवर लोकलच्या डब्यातच महिलेची प्रसुती करण्यात आली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
विरार : विरार रेल्वे स्टेशनवर उभ्या असेलल्या लोकलमध्येच गर्भवतीने बाळाला जन्म दिला. पालघरमधील सफाळे भागात राहणाऱ्या महिलेला ट्रेन प्लॅटफॉर्मवर असतानाच मुलगी झाली. बाळ आणि महिलेची प्रकृती सुखरुप आहे.
सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास विरार रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर ही घटना घडली आहे. सफाळे पूर मालकरी पाड्यात राहणारी सोनी अजय पटेल डहाणू लोकलच्या अपंगांच्या डब्यात बसली होती. विरार स्टेशनवर येताच अचानक तिला प्रसुतीवेदना सुरु झाल्या.
रेल्वे स्थानकावरील आरपीएफ, जीआरपी यांना ही बातमी समजताच त्यांनी महिला पोलिस, सफाई कामगार महिला यांनी तात्काळ बोलावलं. त्यानंतर लोकलच्या डब्यातच सोनीची प्रसुती करण्यात आली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
बाळ आणि महिलेला विरारच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोघींची प्रकृती सुखरुप आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement