एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई-ठाण्यातील ओला-उबर टॅक्सीचालक पुन्हा संपावर
ओला उबर चालक संघटनेच्या वतीने उद्या विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये चालकांच्या कुटुंबीयांचाही समावेश असणार आहे.
मुंबई : मुंबई परिसरातील ओला, उबर टॅक्सीचालक रात्रीपासून पुन्हा संपावर गेले आहेत. मागण्या मान्य करण्याबाबत दिवाळीपूर्वी दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे पुन्हा संपावर जाण्याचा निर्णय ओला उबेरच्या चालक-मालकांनी घेतला आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सुमारे 30 हजार ओला, उबर टॅक्सीचालक-मालक मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे वीकेंडला फिरायला बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना त्रासाला सामोरं जावे लागत आहे.
ओला उबर चालक संघटनेच्या वतीने उद्या विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चामध्ये चालकांच्या कुटुंबीयांचाही समावेश असणार आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील 30 हजार अॅपआधारित टॅक्सीचालक-मालकांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी दिवाळीपूर्वी सलग बारा दिवस संप पुकारला होता. त्यावेळी या टॅक्सीचालक-मालकांनी सरकारसमोर आपल्या 13 मागण्या मांडल्या होत्या.
दिवाळी सुरु होण्यापूर्वी हा संप मिटवण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बैठक घेतली. बैठकीत 15 नोव्हेंबरपर्यंत ओला, उबर टॅक्सीचालक-मालकांच्या संपावर तोडगा काढण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यामुळे हा संप तात्पुरता मागे घेण्यात आला होता.
काय आहेत मागण्या?
- मिनी, मायक्रो, गो प्रति किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50 रुपये ,वेटींग टाईम 2 रुपये मिळावा.
- प्राइम, सिडान प्रति किलोमीटर 15 रुपये, बेस फेअर 75 रुपये, वेटींग टाईम 3 रुपये मिळावा.
- एक्सयूव्ही, एक्सएल प्रति किलोमीटर 19 रुपये, बेस फेअर 100 रुपये, वेटींग टाईम 4 रुपये मिळावा.
- शेअर, पूल, मायक्रो या सर्व बूकिंग मिनी आणि गो या हिशेबाने (प्रति किलोमीटर 12 रुपये, बेस फेअर 50 रुपये ,वेटींग टाईम 2 रुपये)
- रेंटल, हायर प्रत्येक तासाला 250 रुपये आणि 10 रुपये प्रति किलोमीटरनुसार मिळावे.
- आऊटसाईड बूकिंग 150 किलोमीटरला 2000 रुपये आणि 150 किलोमीटरवर मिनी, गो 12 रुपये, प्राइम, सिडान 15 रुपये, एक्सयूव्ही, एक्सएल 19 रुपये प्रति किलोमीटरने धावेल .
- दोन किलोमीटरवरील पिकअप फेअरमध्ये अॅड झाला पाहिजे. त्यामुळे बूकिंग कॅन्सल होणार नाही. कंपनी आणि गाडी मालकाचा फायदा होईल.
- गाडी पिकअप करण्यासाठी 500 मीटर जर गेली आणि पिकअप आल्यावर पाच मिनिटांनंतर बूकिंग कॅन्सल झालं, तर कॅन्सल फी बेस फेअरच्या स्वरुपात मिळावी.
- कंपनीने आपले कमिशन 15%+ टॅक्स हा कट करावा.
- हे सर्व दर 24 तास लागू राहतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
लाईफस्टाईल
निवडणूक
Advertisement