एक्स्प्लोर

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या जुळ्या मुलींवर वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या 14 दिवसांच्या जुळ्या मुलींना वेगळे करण्यात वाडिया हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यश आलं आहे. यासाठी डॉक्टरांना तब्बल सहा तासांचा कालावधी लागला.

मुंबई : छातीपासून बेंबीपर्यंत जोडले गेलेल्या 14 दिवसांच्या जुळ्या मुलींना वेगळे करण्यात वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांना यश आलं आहे. यासाठी डॉक्टरांना तब्बल सहा तासांचा कालावधी लागला. त्यानंतर या दोन जुळ्या मुलींना वेगळं करण्यात आलं.

याबाबत बोलताना वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टर प्रज्ञा बेंद्रे म्हणाल्या की, या मुलींच्या बाबतीत विचार केला तर त्यांची प्रसुतीपासून ते वेगळे करण्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट आव्हानात्मक होती. हे आव्हान वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीरित्या पेलले आहे. वाडिया रुग्णालयातील ही अशाप्रकारची आतापर्यंतची चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. ज्यावेळी या मुली जन्माला आल्या त्यावेळी या दोन्ही बाळांचे एकत्रितरीत्या वजन 4.21 किलोग्रॅम इतके होते. त्यामुळे या बाळांचा जीव वाचवण्याकरता त्यांना विलग करणे गरजेच होतं. त्यामुळे ज्यावेळी बाळांचा जन्म झाला त्यावेळी त्यांना तात्काळ आयसीयुमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले. या शस्त्रक्रियेसाठी बालरोग तज्ञ, नवजात शिशु तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, थोरॅसिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जन या सर्व डॉक्टरांची मदत घेण्यात आली.

याबाबत बोलताना वाडिया रुग्णालयाच्या सीईओ मिनी बनवाल म्हणाल्या की, वाडिया रुग्णालयाने या अवघड आणि खर्चिक शस्त्रक्रियेसाठी कुठल्याही प्रकारचे पैसे घेतलेले नाहीत. आमच्यासाठी बाळांचा जीव वाचणं महत्त्वाचं होतं. वाडिया हॉस्पिटलमध्ये जुळ्यांना विभक्त करणारी ही चौथी यशस्वी शस्त्रक्रिया आहे. ज्यावेळी शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं त्यावेळी याबाबत पालकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. तसेच त्यांना या संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. हार्मोनिक स्कॅल्पेल आणि टी सेलचा वापर करून यकृत कापण्याचे विशेष तंत्रज्ञान या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात आले. त्यामुळे या दोन्ही बाळांचा रक्त वाहण्याचा दर दहा मिलिलिटरपर्यंत कमी झाला होता. कॉन्जॉईटचा यशस्वी दर हा जवळपास पन्नास टक्के आहे. अचूक मूल्यांकन, नियोजन आणि व्यवस्थापनाच्या यशस्वी प्रयत्नानंतर आम्हाला शंभर टक्के यश मिळू शकलं त्यामुळेच ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पडली. आता या लहान बाळांना सामान्य आयुष्य लाभलं आहे.

छातीपासून बेंबीपर्यंत जोडलेल्या जुळ्या मुलींवर वाडिया रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

या मुलींचे आई-वडील शस्त्रक्रियेबाबत बोलताना म्हणाले की, जेव्हा आम्ही आई-बाबा होणार असं समजलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता पण जेव्हा आम्हाला या प्रेग्नेंसी मध्ये असलेल्या गुंतागुंती विषयी डॉक्टरांनी माहिती दिली तेव्हा मात्र आम्ही खूप घाबरलो. वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी आम्हाला शस्त्रक्रियेविषयी पूर्ण माहिती दिली आणि आम्हाला विश्वास देखील दिला की, दोन्ही मुली सामान्य जीवन जगू शकतात. विशेष म्हणजे रुग्णालयाने ही शस्त्रक्रिया मोफत केली असून आमच्यावर आर्थिक भार येऊ दिला नाही. शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन्ही मुली विभक्त झाल्या त्यानंतर त्यांना आजपर्यंत कोणतीही समस्या आलेल्या नाहीत आणि आता या दोन्ही मुली सामान्य जीवन जगत आहेत.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
Virat Kohli Fined for Sam Konstas : अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dahananjay Munde PC FULL : माझ्या जवळचा जरी कोणी असेल तरी शिक्षा झालीच पाहिजे- धनंजय मुंडेPune Crime: 48 वर्षीय मोहिनी वाघ, मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, Satish Wagh case ची A टू Z कहाणीSanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊतTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM :26 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 Ladki Bahin Yojana : अदिती तटकरेंनी महिला व बालविकास खात्याचा पदभार स्वीकारला, लाडकी बहीण योजनेची नवी नोंदणी अन् 2100 रुपयांबाबत स्पष्टच सांगितलं 
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अदिती तटकरे देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत म्हणाल्या... 
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, माझ्या जवळचा असेल तरी...
Virat Kohli Fined for Sam Konstas : अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
अवघ्या 5 तासात कारवाई! 19 वर्षाच्या पोराला धक्का मारणं विराट कोहलीला पडलं महागात, ICC ने दिली मोठी शिक्षा
Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Pune Crime : पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यातील अल्पवयीन मुलींच्या हत्याप्रकरणात मोठी अपडेट, परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या
Satish Wagh Case : दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
दहा वर्ष मोठ्या मोहिनी वाघांशी संबंध, 12 वर्षे लव्ह-अफेअर, कोण आहे अक्षय जावळकर?
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
Satish Wagh Case: पोलिसांसमोर मोहिनी वाघ यांचं रडण्याचं नाटक, पण जवळच्या व्यक्तीने अनैतिक संबधांची टीप पोलिसांनी दिली अन्...
जवळच्या व्यक्तीने अनैतिक संबधांची टीप पोलिसांनी दिली अन् मोहिनी वाघ यांचं रडण्याचं नाटक उघड झालं
Embed widget