Sanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊत
Sanjay Raut Full PC : बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं संरक्षण- संजय राऊत
हेही वाचा :
पुण्यात काही दिवसांपुर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून खून करण्यात आला होता, त्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आलं आहे. सतीश वाघ यांच्या पत्नीनेच आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांचा खून घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी सतीश वाघ हिने संपत्तीच्या तसेच अनैतिक संबंधांच्या संशयातून खून घडवून आणल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मोहिनी सतीश वाघ (वय 53, रा. फुरसुंगी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. आतिश जाधव, पवन श्यामकुमार शर्मा (वय 30, रा. शांतीनगर, धुळे), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय 32, रा. अनुसया पार्क, वाघोली), अक्षय हरीश जावळकर, विकास शिंदे यापूर्वी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Satish Wagh Murder Case) सतीश तात्याबा वाघ यांच्याकडे आरोपी अक्षय हरीश जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. यासंबधीची कुणकुण सतीश वाघ यांना लागल्यामुळे त्यांच्या पत्नीकडूनच खुनाची सुपारी देऊन नवऱ्याचा काटा काढण्याचा डाव आखला. मोहिनी वाघने अक्षयला नवरा सतीश यांचा खून करण्यास सांगितले. त्यासाठी पाच लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यापैकी दीड लाख रुपये तिने अक्षयकडे दिले होते. त्यानंतर अक्षयने चार महिन्यांपूर्वी सतीश यांना मारण्यासाठी पवनला सुपारी दिली होती. त्यानंतर पवनने त्याचा साथीदार नवनाथ आणि विकासला आपल्यासोबत सहभागी करून घेतले.अक्षयने आरोपींना दीड लाखाची रक्कम दिली असल्याची माहिती समोर आली आहे.