Satish Wagh Case: पोलिसांसमोर मोहिनी वाघ यांचं रडण्याचं नाटक, पण जवळच्या व्यक्तीने अनैतिक संबधांची टीप पोलिसांनी दिली अन्...
Satish Wagh Case: सतीश वाघ यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्यावर 70 वार करण्यात आले होते. मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यातील अनैतिक संबंधांचा उलगडा
पुणे: संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या सतीश वाघ हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. सतीश वाघ यांची 9 डिसेंबरला अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा होते. त्यामुळे साहजिकच त्यांच्या हत्येने प्रचंड खळबळ उडाली होती. त्यांच्या अंगावर जवळपास 70 ते 72 वार करण्यात आले होते. या हत्येची सुपारी सतीश वाघ (Satish Wagh) यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची धक्कादायक माहिती बुधवारी समोर आली होती. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत अनैनिक संबंध होते. याच अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली.
सतीश वाघ हत्याप्रकरणाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
* 9 डिसेंबरला सतीश वाघ ते मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अक्षय जावळकर , त्याचा मित्र पावन शर्मा , नवनाथ गुरसाळे आणि आणखी दोघेजण चार चाकी गाडीत दबा धरून बसले होते . सतीश वाघ घरापासून काही अंतरावर आले असता अक्षयने गाडी त्यांच्याजवळ नेली आणि सतीश वाघ यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आलं आणि गाडी पुणे - सोलापूर महामार्गावर नेण्यात आली .
* चालू गाडीतच सतीश वाघ यांच्यावर तब्ब्ल 70 वार करून हत्या करण्यात आली.
* अनैतिक संबंधनांना अडथळा ठरणाऱ्या आणि मोहिनी वाघ यांना त्यामुळे मारहाण करणाऱ्या सतीश वाघ यांच्याबद्दल साचलेला रागातून अक्षय जावाळकरने सतीश वाघ यांचा मृतदेह छिन्न विछिन्न होईपर्यंत त्यांच्यावर वार केले . त्यानंतर सतीश वाघ यांचा मृतदेह दौण्ड तालुक्यातील शिंदवणे घाटात टाकून देण्यात आला .
* सतीश वाघ यांची हत्या पैशांसाठी करण्यात आली असावी असा बनाव रचण्यात आला .
* पोलीस आणि माध्यमांचे प्रतिनिधी जेव्हा वाघ यांच्या घरी पोहोचले तेव्हा मोहिनी वाघ या त्यांच्या मुलांसोबत रडताना दिसून आल्या. आपल्या पतीच्या हत्येचं आपल्याला दुःख झाल्याचं नाटक त्यांच्याकडून वठवण्यात आले.
* मात्र, पोलिसांनी तपास सुरु केला आणि वाघ यांच्या जवळच्या व्यक्तींकडून मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यात अकरा वर्षांपासून सुरु असलेल्या अनैतिक संबंधांची वाच्यता जवळच्या व्यक्तींनी केली .
* या कालावधीत अक्षय जावळकर गायब झाला होता . त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला .
* पोलिसांनी अक्षयला ताब्यात घेऊन त्याच्या मित्रांनाही अटक केली .
* चौकशीत अक्षयने मोहिनी सोबत असलेल्या संबंधांची आणि त्यातून हत्येचा हा कट रच्ल्याची सुपारी दिली आणि पोलिसांनी 25 डिसेंबरला मोहिनीला अटक केली .
आणखी वाचा