Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी 15 दिवसांनंतरही मोकाट! वाल्मिक कराडच्या पवनचक्की खंडणी प्रकरणाचं काय झालं?
खंडणी, मारामारी आणि दहशत माजवण्याचे आरोप होत असलेल्या आणि देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेला वाल्मिक कराडचं काय झालं? याबाबतही कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला तब्बल 15 दिवसांचा कालावधी संपवून मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत. बीड पोलिस आणि सीआयडीला सुद्धा फरार आरोपी सापडत नसल्याचे चित्र आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये आक्रोश सुरु असतानाच राज्यातही संतापाची लाट आहे. खंडणी मारामारी आणि दहशत माजवण्याचे आरोप होत असलेल्या आणि देशमुख यांच्या निर्घृण हत्येमध्येही सर्वाधिक आरोप होत असलेला वाल्मिक कराडचं काय झालं? याबाबतही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे अत्यंत निकटवर्तीय मानला जातो. पवनचक्की दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असून यामधील एक आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली असली, तरी वाल्मिक कराडपर्यंत पोलिस पोहोचलेले नाहीत. सुदर्शन घुले हा खंडणीमधील सुद्धा आरोपी आहे.
संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार
विष्णू चाटेच्या अटकेतून कोणती माहिती समोर आली याबाबतही पोलिसांकडून कोणतीच स्पष्टता देण्यात आलेली नाही. संतोष देशमुख प्रकरणात सुदर्शन घुले, सुंधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे प्रमुख आरोपी आहेत. मात्र, अजूनही फरार आरोपींचा थांगपत्ता बीड पोलिस आणि सीआयडीला लागलेला नाही. बीडचा बिहार झाल्याचा आरोप असताना पोलिसांनी आरोपींच्या शिताफीने मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी जनरेट्यातून होत असतानाच आरोपीच हाती लागत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन!
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिय यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडमधील संबंधांचा सात बाराच समोर आणला आहे. त्यांनी ट्विट करत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन असल्याचे म्हटले आहे. दमानिया यांनी तीन दिवसांपूर्वीच ट्विट केले होते. ट्विटमध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन! हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र, जमीन एकत्र जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले 3554 गुंठे जमीन (88 एकर 34 गुंठे)
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची एकत्र जमीन !
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 23, 2024
हे घ्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील आर्थिक सख्य किती आहे याचे धडधडीत पुरावे.
कंपनी एकत्र, जमीन एकत्र
जगमित्र शुगर्स चे ६ सातबारे मी डिजिटली डाउनलोड केले
३५५४ गुंठे जमीन (८८ एकर ३४ गुंठे) pic.twitter.com/afpORBwTRh
इतर महत्वाच्या बातम्या