Bibek Pangeni and Srijana Love Story : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी! नेपाळपासून अमेरिकेपर्यंत फुललेली अन् मन हेलावून सोडलेल्या श्रीजना अन् विवेकची प्रेमकहाणी
Bibek Pangeni and Srijana Love Story : ही एक प्रेमकथा आहे ज्यामध्ये चित्रपटांसारखा सस्पेन्स, ड्रामा किंवा रोमान्स नसून फक्त भावना आहेत.
Bibek Pangeni and Srijana Love Story : चित्रपट, कथा कांदबऱ्या ते सर्वसामान्यांपर्यंत अशा संघर्षमय प्रेमकहाण्या अनेक प्रेरणादायी होऊ गेल्या आहेत. म्हणून ताजमहल आजही आठवत असतो. चित्रपटांमधून अनेक अजरामर झालेल्या प्रेमकथाही पाहिल्या आहेत, तर तितक्याच प्रेमकथा खऱ्या आयुष्यातही झाल्या आहेत. नेपाळी इन्फ्लुएन्सर श्रीजना सुबेदी आणि विवेक पंगेनी यांची प्रेमकहाणीही अशीच आहे, जी आता कायमची अमर झाली आहे. आज प्रेमाच्या आणाभाका उद्या कधी काडीमोड घेतील याचा अंदाज नसताना श्रीजना आणि विवेकचं समर्पण बरंच काही सांगणारं आहे जे शब्दात वर्णनही काहीवेळा करता येणार नाही.
View this post on Instagram
ही एक प्रेमकथा आहे ज्यामध्ये चित्रपटांसारखा सस्पेन्स, ड्रामा किंवा रोमान्स नसून फक्त भावना आहेत. विवेक-श्रीजनाची कथा सांगते की ते एकमेकांच्या पाठीशी कसे ढाल बनून उभे राहतात आणि आयुष्यातील सर्वात कठीण काळात एकमेकांना साथ देतात. 19 डिसेंबर रोजी विवेक आणि श्रीजना कायमचे वेगळे झाले. स्टेज-4 ब्रेन कॅन्सरशी लढत असताना विवेक पंगेनीचे निधन झाले. कॅन्सरशी लढाई आणि त्यांच्या आयुष्यातील हे चढ-उतार आणि कठीण दिवस पत्नी श्रीजनाने काही व्हिडिओंमध्ये दाखवून दिलं असून जे हृदय पिळवटून टाकणारे आहेत.
View this post on Instagram
दोघांनी मिळून कॅन्सरला हरवण्याचा निर्धार केला
विवेकचा ब्रेन कॅन्सर स्टेज-1 मध्येच आढळून आला होता पण तेव्हापासून सृजना त्याच्यासोबत नेहमी ढाल बनून हजर होती. दोघांनी मिळून कॅन्सरला हरवण्याचा निर्धार केला आणि करोडो लोक त्याचे साक्षीदारही झाले. श्रीजना बळावर उभी राहिली पण कदाचित नशीब तिच्या बाजूने नव्हते. शेवटी कॅन्सरचा विजय झाला, पण त्यांच्या प्रेमकथेतून दोघांनी लग्न, प्रेम आणि सहवास याचा खरा अर्थ काय हे जगाला नक्कीच सांगितले. यावेळी दोघांनीही आनंदाचे क्षण खुलेआम साजरे केले. ऑगस्टमध्ये सृजनाने विवेकच्या 32व्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. नवऱ्याचा वाढदिवस खास बनवला होता. विवेकच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. सर्व प्रयत्न करूनही विवेकचा डिसेंबरमध्ये मृत्यू झाला. श्रीजनाने तिच्या यूट्यूब चॅनलवर या बातमीला दुजोरा दिला आहे.
View this post on Instagram
अनेकांनी विवेक-सृजनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि ही सर्वात अनोखी प्रेमकथा असल्याचे मानले. अनेक युजर्स म्हणतात की, कॅन्सरशी लढण्यासोबतच सृजना प्रत्येक पावलावर विवेकच्या पाठीशी उभी राहिली. मग ते त्यांच्यासाठी केस काढणे असो किंवा त्यांची सर्व कामे मी स्वत: करत असतो. विवेकच्या अंत्यसंस्काराच्या वेळी श्रीजनाची अवस्था वाईट होती, रडत होती. तिला पाहून सर्वांचे डोळे पाणावले. त्यांची प्रेमकथा खरोखरच निष्ठा आणि समर्पणाचे उदाहरण आहे. त्यामुळेच विवेक-सृजना सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहेत. त्यांचा एकत्र प्रवास आता संपला असेल, परंतु त्यांची प्रेमकथा नेहमीच लोकांना प्रेमाची शक्ती आणि सहवासाचा अर्थ शिकवेल आणि प्रेरित करेल.
इतर महत्वाच्या बातम्या