IAS संजीव जयस्वाल यांचे ठाण्यातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप, 'गोल्डन गँग'बाबत गौप्यस्फोट!
ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल (IAS Sanjeev Jaiswal) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून ठाण्यात चालणाऱ्या 'गोल्डन गॅंग' बाबत (Goldan gang In Thane) गौप्यस्फोट केला आहे.
ठाणे : आयपीएस अधिकाऱ्यांच्या (IPS Officer Letter) लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) खळबळ उडाल्यानंतर आता आयएएस अधिकाऱ्याच्या लेटर बॉम्बची चर्चा आहे. ठाणे महानगरपालिकेचे माजी आयुक्त संजीव जयस्वाल (IAS Sanjeev Jaiswal) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून ठाण्यात चालणाऱ्या 'गोल्डन गॅंग'चा (Goldan gang In Thane) खुलासा केला आहे. ज्यात काँग्रेस, एनसीपीसारख्या (NCP, Congress Corporate) मोठ्या पक्षांचे आजी माजी नगरसेवक आहेत. संजीव जयस्वाल विरुद्ध काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर (Sanjay Ghadigaonkar) असा वाद चव्हाट्यावर आला असून जयस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित संजय घाडीगांवकर यांनी गैरव्यवहार केल्याची तक्रार केली आहे.
या तक्रारी संदर्भात संजीव जयस्वाल यांनी मुख्यमंत्री यांना आपला खुलासा दिला आहे. ज्यामध्ये संजय घाडीगांवकर हे एक खंडणीखोर, ब्लॅकमेलर, गुंड असल्याचा आरोप केला आहे. जयस्वाल यांनी आरोप केली बिल्डर सुरज परमार केसमध्ये अटक करण्यात आलेले चार आरोपी एनसीपी नगरसेवक नजीब मुल्ला, हनमंत जगदाळे, काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण आणि मनसेचे माजी नेते सुधाकर चव्हाण सोबत संजय घाडीगांवकर गोल्डन गॅंग चालवतो.
जे ठाण्यात खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि अनाधिकृत काम करुन पैसे कमवतात. जयस्वाल यांचा आरोप आहे की ठाण्यात ही टोळी खूप सक्रिय आहे. यांच्या विरुद्ध त्यांनी टीएमसी कमिश्नर असताना कारवाई केली होती. त्याच्यामुळे संजय घाडीगांवकर यांचं नगरसेवक पद रद्द झालं आणि त्याचा राग म्हणून आपल्याविरुद्ध खोटी तक्रार केली जात आहे, असं जयस्वाल यांनी म्हटलं आहे. जयस्वाल यांनी पत्रात ठाण्यातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना जयस्वाल यांनी एक पाच पानांचं पत्र लिहिलं आहे.
या पत्रात त्यांनी आपण ठाण्याचे आयुक्त असताना घाडीगावकर आपल्याला मानसिक त्रास देत होते. मला धमक्या देखील देत होते असं त्यांनी म्हटलं आहे. संजय घाडीगावकर यांच्या विरोधात सविस्तर क्रिमिनल चौकशी करावी अशी मागणी देखील जयस्वाल यांनी पत्रात केली आहे.