एक्स्प्लोर

Khichdi Scam: कोविड काळात झालेल्या खिचडी घोटाळ्याचे धागेदोर संजय राऊत यांच्या कुटुंबीयांपर्यंत?

BMC Khichdi Scam: कोविड काळातील खिचडी घोटाळ्याचे धागेदोरे राऊतांच्या कुटुंबापर्यंत. पैसे मुख्य आरोपीच्या खात्यातून राऊतांचे भाऊ संदीप, मुलगी विधिताच्या खात्यावर जमा झाल्याचं आलं समोर.

Maharashtra Khichdi Scam: राज्यात कोविड (Covid-19) काळात गाजलेल्या खिचडी घोटाळ्याचे (Khichdi Scam Case) धागेदोरे आता थेट ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचल्याचं बोललं जात आहे. खिचडी घोटाळ्यातील भ्रष्टाचाराचे पैसे मुख्य आरोपी राजीव साळुंखे (Rajiv Salunkhe) यांच्या खात्यातून संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujit Patkar) यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर हे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत (Sandip Raut) आणि कन्या विधीता राऊत (Vidhita Raut) यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यासह राऊत कुटुंबीयांच्याही अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. 

कोविड काळात खिचडीचं कंत्राट मिळालेल्या सह्याद्री रिफरेशमेन्ट कंपनीचे राजीव सांळुखे यांच्या खात्यातून लाखोंचा निधी सुजीत पाटकर यांच्या खात्यात जमा झाल्याचे पुरावे आता समोर आले आहेत. सुजीत पाटकरांच्या खात्यातून हाच निधी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊत आणि कन्या विधीता राऊतांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमका हा खिचडी घोटाळ्यातील पैसा कसा फिरवला गेला? 

  • सुजीत पाटकर यांच्या खात्यातून संदीप राऊत यांच्या खात्यावर 7.75 लाख रुपये तर विधिता राऊत यांच्या खात्यावर 14.75 लाख जमा झाल्याचे पोलीस तपासात उघड
  • कोविड काळात खिचडी बनवण्याचे कंत्राट चुकीच्या पद्धतीने देऊन, मोठा भ्रष्ट्राचार केल्याचे पोलिस तपासात उघड
  • खिचडी बनवण्याचे कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कंपनीची कागदपत्रे देऊन कंत्राट मिळवल्याचा पोलिसांच आरोप
  • खिचडी बनवण्याचे कंत्राट संजय राऊत यांचे निकटवर्तिय बाळा कदम यांच्या मे वैष्णवी किचन (सह्याद्री रिफरेशमेन्ट) या नावाने देण्यात आले
  • मूळात या कंपनीचा पत्ता चुकीचा देण्यात आला असून या कंपनीकडे अन्न व प्रशासनाचा परवाना नसतानाही वाटाघाटी करून ते कंत्राट दिल्याचे पोलीस तपासात उघड झालंय.
  • इतक्यावरच न थांबता मुंबई महापालिकेने प्रति 300 ग्रॅम खिचडीचे 33 रुपये मंजूर केले असताना, प्रत्यक्षात मात्र 100 ग्रॅम खिचडीचे वाटप करत 5 कोटी 93 लाख 97 हजार 235 रुपये स्विकारून प्रत्यक्षात खिचडी बनवण्यासाठी 3.20 कोटी देत, उर्वरित 2 कोटी 3 लाखाच्या निधीचा गैर वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • खिचडी वाटपाची वर्क ऑर्डर मिळवून देण्यास मदत केल्याचे आणि खिचडी कन्सलटन्सी सर्विसेस पुरवल्या म्हणून मे एमएसपी असोसिएटचे सुजीत पाटकर यांना गैर लाभातून  पैसे मिळाल्याची सूत्रांची माहिती
  • सुजीत पाटकर यांच्या खात्यातून गैरलाभातून मिळालेले 45 लाख रुपये तसेच सुजीत पाटकर यांच्या सांगण्यानुसार विधिता राऊत यांच्या खात्यात 14.75 लाख, तर संदीप राऊत याच्या खात्यात 7.75 लाख रुपये वळते केल्याचेही पुरावे पोलिसांना सापडले असून या आर्थिक घोटाळ्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत. 

खिचडी घोटाळा नेमका आहे तरी काय? 

मुंबई महानगरपालिकेचा कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा चर्चेत असतानाच आता आणखी एका घोटाळ्या प्रकरणी कारवाई सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा आता समोर आला आहे. गरिब मायग्रेन कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या मायग्रेन कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आले, असं मुंबई महानगरपालिकेचे म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचीच चौकशी सुरू आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget