Sea-Bridge Marathon : अटल सेतूवरून सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात, अभिनेता अक्षय कुमारसर टायगर श्रॉफची हजेरी
Atal Setu Marathon : मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) म्हणजे अटल सेतू शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14 तासांसाठी बंद असेल.
L&T Sea-Bridge Marathon : देशातील पहिला सागरी पूल असलेल्या अटल सेतूवरून (Mumbai Trans Harbour Link) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीएच्या सहयोगाने लार्सन आणि टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला (Sea-Bridge Marathon) सुरुवात झाली आहे. नवी मुंबईमधील (Navi Mumbai) प्रवास सुलभ करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा (Atal Bihari Vajpayee Trans Hbr Link) अटल सेतूवर (Atal Setu) आज, रविवारी 'द टाइम्स ऑफ इंडिया' आणि 'एमएमआरडीए'च्या सहयोगाने लार्सन अँड टुब्रो सी-ब्रीज मॅरेथॉनला पहाटे पाच वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सागरी पुलावरील ही पहिली मॅरेथॉन असून 42 किमी, 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी अशी मॅरेथॉन पार पडणार आहे.
अटल सेतूवरून सी-ब्रीज मॅरेथॉनला सुरुवात
रविवारी सकाळपासूनच या मॅरेथॉनला धावपटूंनी मोठी उपस्थिती लावली आहे, या मॅरेथॉनमुळे वाहनधारकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अटलसेतूवरील मार्गात बदल करण्यात आला आहे. यासह, वाहतूक पोलीस आणि पोलिसांनीही पुरेशी तयारी केली आहे. या मॅरेथॉनला बॉलिवूड कलाकार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांनी उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत. अटल सेतूवर अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने बाईक चालवत एन्ट्री केली.
अभिनेता अक्षय कुमारसह टायगर श्रॉफची हजेरी
सी-ब्रीज मॅरेथॉनमध्ये धावपटूंनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचं दिसत आहे. सकाळी सहा वाजता 21 किमी मॅरेथॉनला सुरुवात झाली. सकाळी सहाच्या मॅरेथॉनला टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची उपस्थिती असून अक्षय कुमार यांच्या हस्ते धावपटूंना हिरवा झेंडा दाखवला जात आहे.
अटल सेतूवर वाहनांना परवानगी नाही
मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक (MTHL) म्हणजे अटल सेतू शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14 तासांसाठी बंद असेल. रविवारी सकाळी अटल सेतूवर L&T सी ब्रिज मॅरेथॉन 2024 आयोजित करण्यात आल्याने अटल सेतू बंद ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी X वर पोस्ट करत सांगितलं आहे की, या दरम्यान अटल सेतूवर वाहनांना परवानगी दिली जाणार नाही.
In view of the #AtalSetu (MTHL) route Marathon from Gadi Adda Mumbai to Chirle Navi Mumbai on Sunday 18th Feb, following arrangements will be in place from 11 pm on 17th Feb to 1 pm on 18th Feb.
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) February 17, 2024
• No vehicles will be allowed on #AtalSetu during this period#MTPTrafficUpdates pic.twitter.com/SbBUzOt0HN
14 तासांसाठी अटल सेतू बंद
मुंबई पोलिसांनी पोस्ट केले आहे की, रविवार 18 फेब्रुवारी रोजी गाडी अड्डा मुंबई ते चिर्ले नवी मुंबई या अटलसेतू (MTHL) मार्गाच्या मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर, 17 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 18 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पुढील व्यवस्था करण्यात येणार आहे. या कालावधीत कोणत्याही वाहनांना अटल सेतूवरून (Atal Setu) परवानगी दिली जाणार नाही.