शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
वढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. शुभमन गिलचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. असं असलं तरीदेखील, शुभमन गिल कुणाला डेट
Shubman Gill And Sara Tendulkar Went On Vacation: टीम इंडियाच्या (Team India) तरुण खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी असलेला प्रिन्स म्हणजेच, शुभमन गिल (Shubman Gill). आपल्या शानदार खेळीनं त्यानं आधीच अनेकांची मनं जिंकली आहेत. तर, अनेक तरुणींच्या गळ्यातील तो ताईतही बनला आहे. शुभमन गिल जेवढा क्रिकेटसाठी चर्चेत असतो, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. शुभमन गिलचं नाव अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलेलं आहे. असं असलं तरीदेखील, शुभमन गिल कुणाला डेट करतोय, हे अद्याप त्यानं उघड केलेलं नाही. पण, तरीदेखील तो एका मिस्ट्री गर्लसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगलेल्या असतात.
शुभमन गिलचं नाव प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) मुलीसोबत जोडलं जातं. दोघांना अनेकदा पॅपाराझींनी स्पॉटही केलं आहे. तेव्हापासूनच दोघांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा रंगू लागल्या. अशातच सोशल मीडियावर सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांचे व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आजवर दोघांपैकी कुणीच त्यांच्या नात्याबाबत काहीच बोललेलं नाही. अशातच आता थेट व्हेकेशन फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, सारा तेंडुलकर (Sara Tendulkar), शुभमन गिलसोबत व्हाईट टी-शर्ट आणि शॉर्ट्स घालून पोज देताना दिसत आहे. शुभमन गिलनंही सारासोबत ट्युनिंग केल्याचं पाहायला मिळत आहे.
दोघांचा फोटो AI नं बनवलेला?
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोत सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल दोघेही एका क्रूजवर एकत्र टाईम स्पेंड करत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, दोघांचे फोटो पाहून लोक पुरते हैराण झाले आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं की, अरे हे कधी जुळलं? तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, फोटो पाहून तरी असंच वाटतंय की, दोघे खरंच एकत्र व्हेकेशनसाठी गेले आहेत. दरम्यान, हे फोटो खरे नाहीत, तर हे फोटो AI जनरेटेड आहेत. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल व्यतिरिक्त असेल AI मेड फोटो इतर अभिनेत्री आणि खेळाडूंचेही तयार करण्यात आले होते. तसेच, हे फोटो व्हायरलही करण्यात आलेले. त्यामुळे हे फोटो खरे नाहीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :