Police Patil : राज्यातील पोलीस पाटलांना बिन पगारी, फुल अधिकारी म्हणण्याची वेळ; पाच महिन्यांपासून मानधन थकीत
राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलीय. राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Maharashtra Police Patil : राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील (Police Patil) संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेलं असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . त्यामुळे राज्यातील गावगाड्यातला महत्वाचा घटक असलेला पोलीस पाटील सहा महिन्यांपासून 'बिन पगारी, फुल अधिकारी बोलण्याची वेळ पोलीस पाटलांवर आलीय. फेब्रुवारीपासूनचं पोलीस पाटलांचं मानधन थकीत आहे. एप्रिल 2024 पासून पोलीस पाटलांचं मानधन हे 15 हजार रुपये झाले आहे. आधी हेच मानधन 6500 रूपये इतके होते. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने हेच मानधन दुप्पट केले आहे. असे असले तरी राज्यातील पोलीस पाटलांचं मानधन गेल्या पाच महिन्यांपासून थकीत असल्याने पोलीस पाटलांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामाना करावा लागतो आहे.
पाच महिन्यांपासून पोलीस पाटलांचं मानधन थकीत
राज्यातल्या गाव खेड्यात कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस पाटील हे एक महत्वाचे पद असून प्रथमिक पातळीवर पोलीस पाटील महत्वाची भूमिका बजावत असतात. राज्यात सध्या घडीला एकूण 37 हजार पोलीस पाटील आहेत. तर दुसरीकडे जवळपास 8 हजार पदं रिक्त असल्याची माहिती आहे. मात्र पोलीस पाटलांचे गेल्या पाच महिन्यांचे प्रत्येकी 58 हजार अडकलेले असल्याने पोलीस पाटील मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सरकार नेमकं कधी वेतन देणार याची पोलीस पाटलांना प्रतिक्षा लागली आहे.
कडक सुरक्षा व्यवस्थेत लेखी पोलीस भरती परीक्षा
पोलीस आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 45 पोलीस शिपाई पदासाठी आज 11 ते दुपारी 12.30 या वेळात यवतमाळच्या गोधणी मार्गावरील अँग्लो हिंदी हायस्कूल येथे लेखी परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी उमेदवारांना काळा बॉल पेन पोलीस दलाकडून देण्यात आला आहे. केवळ याच पेनचा लेखी परीक्षेसाठी वापर करता येणार आहे. परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस दलाकडून इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटर, पेन, पेन्सिलसोबत आणण्यास मनाई करण्यात आल. शूज सुद्धा बाहेर काढून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. टेक्नॉलॉजीचा फायदा चुकीच्या पद्धतीने घेण्यात येतो. पेनमध्ये छुपे कॅमेरे बसविता येऊ शकते. आपल्या साध्या डोळ्याने ते दिसतही नाही त्यामुळे पोलिसांकडून परीक्षेसाठी पेन पुरविण्यात आले आहे. महाराष्ट्रात या पद्धतीची ही भरती यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात येत असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सांगितले.
हे ही वाचा :