Shani Gochar 2025 : होळी झाली आता 'या' 3 राशींचं उजळणार भाग्य; अचानक मिळणार मोठी संधी, जगाल राजासारखं आयुष्य
Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 29 मार्च 2025 रोजी शनी राशी संक्रमण करणार आहे. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनंतर शनी गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनी (Lord Shani) ग्रह अडीच वर्षांनंतर राशी परिवर्तन करतात. त्यामुळेच शनीला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी आपली मूळ रास म्हणजेच कुंभ राशीत विराजमान आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार, शनी 29 मार्च 2025 रोजी शनी राशी संक्रमण करणार आहे. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनंतर शनी गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होतील. शनीचं हे राशी संक्रमण कोणकोणत्या राशींसाठी शुभ असणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचं राशी संक्रमण फार शुभकारक ठरणार आहे. या राशींच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तुमच्या पद,प्रतिष्ठेत चांगली वाढ होईल. तुमचं एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
शनी ग्रहाचं राशी परिवर्तन मकर राशीच्या लोकांची साडेसाती दूर करण्यास फार महत्त्वाचं असणार आहे या काळात तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ होईल. तुमच्यातील नातं अधिक घट्ट होईल. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना देखील चांगला वाव मिळेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कामे पूर्ण करु शकाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
शनीचं राशी संक्रमण कुंभ राशीसाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. या काळात तुमची साडेसातीपासून सुटका होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल. तसेच, जे बरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : आज चंद्राधि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद, मिळणार चौफेर लाभ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
