Chhaava Box Office Collection Day 29: होळीच्या दिवशी 'छावा'नं रचला इतिहास; 'पुष्पा 2'ला पछाडलं, 29व्या दिवशी पाडला पैशांचा पाऊस
Chhaava Box Office Collection: होळीच्या निमित्तानं 'छावा'च्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाली आणि प्रचंड कलेक्शन केलं. यासह, हा चित्रपट 29 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Chhaava Box Office Collection Day 29: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' चित्रपट (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला जवळजवळ एक महिना उलटला. पण, त्याच्या कमाईच्या गतीत कोणतीही घट होण्याची चिन्हं दिसत नाहीत. बॉक्स ऑफिसवर (Box Office) सध्या सुरू असलेल्या 'छावा'च्या धुवांधार कमाईमुळे भल्या भल्या दिग्गजांची झोप उडाली आहे. 'छावा'नं रिलीज होताच मोठा विक्रम रचत 2025 च्या सर्वात मोठा ओपनरचा मान पटकावला. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवत आहे आणि नवा विक्रमही करत आहे. होळीच्या निमित्तानं 29 व्या दिवशी 'छावा'नं किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...
'छावा'नं 29 व्या दिवशी किती कमाई केली?
लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित आणि विक्की कौशल, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshaye Khanna) अभिनीत 'छावा' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी रुपेरी पडद्यावर मांडलेली छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली. आता चित्रपट रिलीज होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. तरीसुद्धा 'छावा'ची क्रेझ फारशी कमी झालेली नाही. होळीच्या निमित्तानं म्हणजेच, 29व्या दिवशी 'छावा'च्या कमाईत कमालीची वाढ झाली आणि बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. जर आपण चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार,
विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाला जवळजवळ एक महिना झाला आहे, परंतु त्याच्या कमाईच्या गतीत कोणतीही घट होण्याची चिन्हे नाहीत. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमवत आहे आणि नवा विक्रमही करत आहे. होळीच्या निमित्तानं 29 व्या दिवशी 'छावा'नं किती कमाई केली? हे सविस्तर जाणून घेऊयात...
View this post on Instagram
'छावा' नं 29 व्या दिवशी किती कमाई केली?
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना अभिनीत 'छावा' प्रेक्षकांना खूप आवडला आहे. वीर संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली आहे आणि हा ऐतिहासिक चित्रपट थिएटरमध्ये जवळजवळ एक महिना पूर्ण केल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनातलं आपलं स्थान राखून आहे. होळीच्या निमित्तानं, म्हणजेच 29 व्या दिवशी, 'छावा'च्या कमाईत वाढ झाली आणि त्यानं बंपर कलेक्शन केलं. जर आपण चित्रपटाच्या आतापर्यंतच्या व्यवसायाबद्दल बोललो तर, सॅकनिल्कच्या आकडेवारीनुसार,
- 'छावा'नं रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 219.25 कोटी रुपये कमावले होते.
- दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने 180.25 कोटी रुपये कमावले.
- 'छावा'नं तिसऱ्या आठवड्यात 84.05 कोटी रुपये कमावले.
- चौथ्या आठवड्याचे कलेक्शन 55.95 कोटी रुपये होते.
- आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 29 व्या दिवशी म्हणजेच, पाचव्या शुक्रवारी झालेल्या कमाईचे सुरुवातीचे आकडे समोर आले आहेत.
सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, 'छावा'नं 29 व्या दिवशी म्हणजेच, आज होळीच्या दिवशी रात्री 10:30 वाजेपर्यंत 7.25 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचं एकूण कलेक्शन 559.43 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. यामध्ये, चित्रपटानं आतापर्यंत हिंदीमध्ये 534.2 कोटी आणि तेलुगूमध्ये 'छावा'नं 12.55 कोटी कमावले आहेत.
'छावा' 29 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला
29 व्या दिवशीही 'छावा'ची क्रेझ प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. यासह, चित्रपटानं 29 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करून इतिहास रचला आहे आणि पुष्पा 2, अॅनिमल, पठाण, जवान, स्त्री 2 यासह सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे.
'छावा'नं 29 व्या दिवशी हिंदी भाषेत 6.5 कोटींची कमाई केली आहे.
पुष्पा 2 नं 29 व्या दिवशी 3.75 कोटी रुपये कमावले.
29 व्या दिवशी 'स्त्री 2' नं 2.75 कोटी रुपये कमावले.
भूल भुलैया 3 नं 29 व्या दिवशी 2.4 कोटी रुपये कमावले.
29 व्या दिवशी 'जवान'नं 1.78 कोटी रुपये कमावले.
केजीएफ चॅप्टर 2 नं 29 व्या दिवशी 1.7 कोटी रुपये कमावले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
