रायगडमधील कुंडलिका नदी पात्रातील दलदलीचं रुपांतर नंदनवनात!
कुंडलिकेच्या काठावर उदयास आलेल्या या संस्कृतीने या परिसरात रोजगार दिला, रोहा परिसराला समृद्धी दिली, पण दुसरीकडे या औद्योगिक संस्कृतीच्या प्रसव वेदनांनी या संस्कृतीची जन्मदात्री असलेली कुंडलिका मात्र गलीतगात्र झाली. खरंतर कुंडलिका ही बारमाही वाहणारी नदी, पण औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणादी समस्यांच्या झळा कुंडलिकेला बसल्या.

रायगड : नदी केवळ जीवन वाहिनी नसते ती संस्कृतीलाही जन्म देत असते. त्यामुळे जगाच्या पाठीवरील प्रत्येक नदीकाठी संस्कृतीने जन्म घेतला आहे. काळाच्या ओघात संस्कृतीचे स्वरूप बदलत गेले. प्राचीन, अर्वाचीन संस्कृतीबरोबरच, आधुनिक संस्कृती नद्यांकिनारी जन्मास येऊ लागली. रोह्याची जीवनवाहिनी असलेली कुंडलिका देखील आधुनिक संस्कृतीची जन्मदात्री म्हणावी लागेल. स्वर्गवासी पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या रुपाने या नदीच्या काठी अध्यात्मिक संस्कृती जन्मली आणि नंतर जगभरात ती बहरली. स्वर्गीय चिंतामणराव देशमुख यांच्या रूपाने राजकीय आणि सामाजिक संस्कृती बहरली. या संस्कृतीने देशाच्या अर्थकारणाला दिशा दिली. गेल्या तीस चाळीस वर्षाच्या काळात कुंडलिकेच्या तीरावर एक आधुनिक संस्कृती उदयास आली आहे. ती आहे, औद्योगिक संस्कृती. या औद्योगिक संस्कृतीने उद्योग क्षेत्रात रोह्याचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले आहे.
कुंडलिकेच्या काठावर उदयास आलेल्या या संस्कृतीने या परिसरात रोजगार दिला, रोहा परिसराला समृद्धी दिली, पण दुसरीकडे या औद्योगिक संस्कृतीच्या प्रसव वेदनांनी या संस्कृतीची जन्मदात्री असलेली कुंडलिका मात्र गलीतगात्र झाली. खरंतर कुंडलिका ही बारमाही वाहणारी नदी, पण औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणादी समस्यांच्या झळा कुंडलिकेला बसल्या. या नदीचे पात्र दलदलीने भरले. या नदीच्या तीरावर जाणे कष्टप्रद बनले. या नदीला मूळ सौंदर्य लाभावे, तिचा तीर पशुपक्षी, वृक्षराजीने बहरावा, तिच्या पात्रात मुक्त सैर करण्याचे भाग्य लाभावे ही प्रत्येक रोहेकर यांच्या मनातील भावना. ती ओळखली खासदार सुनील तटकरे यांनी. केवळ ओळखलीच नाही तर रोहेकरांच्या मनातील या भावनेला मूर्त रूप देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. आणि आज ती भावना, ते स्वप्न सत्यात उतरले आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून हाती घेण्यात आलेला कुंडलिका संवर्धन प्रकल्प पूर्ण झाला आहे. कुंडलिकेच्या तीरावर आणि कुंडलीतील दलदलीत आज नंदनवन फुलले आहे. सौंदर्याचे नवे लेणे घेऊन खऱ्या अर्थाने आज कुंडलिका नव्या रूपात रोहेकरांसमोर आणि रायगडवासियांसमोर आली आहे. या संवर्धनाचे किमयागार ठरले आहेत रायगड चे खासदार सुनील तटकरे.
आज कुंडलिका नदी संवर्धनाचे लोकार्पण देशाचे माजी कृषिमंत्री खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून, रोह्याच्या वैभवात या प्रकल्पामुळे नक्कीच भर पडणार आहे.
रोहे अष्टमी कुंडलिका नदीच्या दोन्ही तीरावर कुंडलिका नदीत संवर्धन हा प्रकल्प आणण्यात खासदार सुनील तटकरे यांना यश आले. राज्य सरकारच्या सहकार्यातून रोहे अष्टमी नगरपालिकेच्या माध्यमातून कुंडलिका नदीच्या दोन्ही तीरावर साबरमतीच्या धरतीवर उत्तम असा देखणा कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प साकारला आहे.
आज लोकार्पण होत असलेल्या कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प हा रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प ते 33 कोटींचा आहे. कोरोनामुळे गेले वर्षभर अनेक निर्बंध असून देखील दोन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेल्यामुळे रोहेकर समाधानी आहेत. रविराज इंजिनिअरिंग कोल्हापूर यांनी या प्रकल्पाचे काम अत्यंत उत्तम प्रकारे पूर्ण केले असून, त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. नदी संवर्धन प्रकल्पांमध्ये जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळणी, विविध प्रकारची फुलझाडे, बसण्यासाठी बाकडे, वाहनतळ आदींचा समावेश आहे. डोळ्याचे पारणे फिटेल असा नजराणा या परिसरात बघायला मिळत आहे.
रोहे अष्टमीयांना जोडणारी साधारण एक किलोमिटरची संरक्षण भिंत बांधण्यात आली असून, भिंतीवर सामाजिक प्रबोधनात्मक संदेश रेखाटण्यात आले आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या काटेकोर नियोजनातून तसेच रायगडच्या पालकमंत्री नामदार अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेला कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्प हा रोह्याच्या श्रीमंतीत भर घालणार आहे. करायचे ते अभूतपूर्व असा निश्चय केलेल्या तटकरे पिता-पुत्रांनी टीम रोहे अष्टमी नगर परिषदेच्या मार्फत या प्रकल्पाच्या माध्यमातून दलदलीच्या जागेत नंदनवन फुलवण्यासाठी फुलवण्याची किमिया साकारली आहे.
कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पाचे काम साकारत असताना वेळोवेळी सर्व स्तरातील रोहेकरांशी चर्चा करून हा प्रकल्प सर्वसमावेशक होईल याकडे खासदार सुनील तटकरे यांनी स्वतः जातीने लक्ष दिले. या प्रकल्पासंबंधी आलेल्या सर्व योग्य सूचनांचा आदर करत हा प्रकल्प अधिकाधिक लोकाभिमुख होईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. आज या प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर येथील रमणीय आणि प्रसन्न वातावरणामुळे देशासह महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील पर्यटक कुंडलिकेच्या तीरी येऊन दादांच्या स्पर्शाने पावन झालेले कुंडलिकेचे तीर्थ प्राशन करतील असा विश्वास रोह्यातील जाणकार व्यक्त करत आहेत. कुंडलिका नदी संवर्धन आणि उद्यान लोकार्पण सोहळा निमित्त रोहे शहर आणि अष्टमी दोन दिवस आनंदात आनंद उत्सव साजरा होत असल्याचे दिसून येत आहे. कुंडलिकेच्या तीरावर बाजारपेठ आणि धार्मिक स्थळांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आल्याने सर्व धावीर नगरी नटली आहे. कुंडलिका नदी संवर्धन प्रकल्पामुळे रोह्यातील पर्यटन वाढीस लागणार आहे. अनेकांना यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे.त्यामुळे हा प्रकल्प रो यासाठी नक्की टर्निंग पॉइंट ठरणार आहे.
कुंडलिका संवर्धन प्रकल्पामुळे रोहा शहरातील रोहे शहराच्या आणि कुंडलिकेच्या वैभवात भर पडणार असल्याची प्रतिक्रिया रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. कुंडलिकेच्या काठावर असलेल्या पडीक जागेचा वापर करून त्या ठिकाणी हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. नदी संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून हे काम आहे करण्यात आले आहे. त्यामुळे रोहे शहरातील सर्व जाती-धर्माच्या आणि सर्व वयोगटातील नागरिकांना एक चांगले दालन यामुळे उपलब्ध झाले आहे. जिल्ह्यातील त्याचप्रमाणे जिल्ह्याबाहेरील पर्यटक या ठिकाणी येतील असा विश्वासही खासदार तटकरे यांनी व्यक्त केला आहे. याच प्रकल्पाबरोबर या ठिकाणी शिवसृष्टी चा प्रकल्प आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून साखर होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते कुंडलिका संवर्धन प्रकल्पाचे लोकार्पण करण्याचे भाग्य आम्हाला लाभले याचा विशेष आनंद होत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
