नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी राष्ट्रवादी-भाजपकडून मोर्चा, दोन्ही पक्षांचे मोर्चे समोरासमोर येण्याची शक्यता
Navi Mumbai : नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपकडून मोर्चा काढण्यात आला आहे.

Navi Mumbai : नवी मुंबईत झाडांची कत्तल रोखण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) आणि भाजपकडून (BJP) मोर्चा काढण्यात आला आहे. दरम्यान दोन्ही पक्षांचे मोर्चे इथं समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत. भाजपच्या मोर्चाचं नेतृत्व गणेश नाईक करत आहेत तर राष्ट्रवादीचा मोर्चा जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात होत आहे.
राष्ट्रवादी-भाजपकडून मोर्चा, दोन्ही पक्षांचे मोर्चे समोरासमोर येण्याची शक्यता
नवी मुंबईतील वाशी अरेंजा सर्कल ते कोपरी असा 2 किलोमीटरचा उड्डाणपूल होणार आहे. उड्डाणपुलासाठी 400 झाडे काढण्यात येणार आहेत. याला विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड 'चिपको' आंदोलन करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता याच ठिकाणी भाजपा आमदार गणेश नाईक या झाडांच्या संरक्षणाबरोबरच नवी मुंबईतील विविध प्रश्नांबाबत जनजागृती लाँगमार्च काढण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाडांचा गणेश नाईकांवर गंभीर आरोप
या आंदोलना दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईकांवर गंभीर आरोप केला आहे. झाडे तोडण्याचा ठराव गणेश नाईक यांचाच असल्याचं आव्हाड म्हणाले. 2008 साली वाशीत उड्डाणपुल व्हावा हा ठराव गणेश नाईक यांच्या नगरसेवकांनी केला. गणेश नाईक कुणाचे होवू शकत नाहीत. जे बाळासाहेब ठाकरे यांचे नाही झाले. शरद पवार यांचे नाही झाले. ते देवेंद्र फडणवीस यांचे कसे होणार? देवेंद्र फडणवीस यांनी गणेश नाईकांवर विश्वास ठेवू नये असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे.
रस्त्याच्या कामासाठी 2500 झाडांची कत्तल करण्याचा डाव
एमआयडीसी महापे विभागीय कार्यालयाकडून रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जवळपास अडीच हजाराच्या वर झाडांचा बळी यात जाणार आहे. योग्य रित्या झाडांचे स्थलांतरण न करता एमआयडीसी अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम हाती घेतल्याने पर्यावरण सामाजिक संस्थांनी या विरोधात पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार केली आहे. विकास कामात अडथळा येणारी झाडे कापण्यासाठी किंवा दुसरीकडे स्थलांतरीत करण्यासाठी लोकांच्या हरकती सुचना मागवले गरजेचे आहे. याबाबत मुख्य वृत्तपत्रात जाहिराती देऊन यावर जनजागृती केली जाते. मात्र, एमआयडीसी अधिकाऱ्यांनी ठाणे शहरातील स्थानिक दैनिकात याबाबत प्रसिध्दी देवून तडकाफडकी घाईने हरकती सूचना मागवल्या आहेत. याचा स्थानिक नागरिकांना सुगावा लागू नये अशी जाणिवपुर्वक खबरदारी अधिकारी वर्गाने घेतल्याचा आरोप पर्यावरण संस्थांनी केलाय. विशेष म्हणजे एमआयडीसी प्रशासनाकडे तज्ञ वृक्ष अधिकारी नसताना या हजारो झाडांच्या कत्तलीसाठी परवानगी देण्याची घाई करण्यात आली आहे. याविरोधात आता राजकीय पक्षातील नेतेमंडळी रस्त्यावर उतरले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
