Devendra Fadnavis : आमदार अपात्रता निकालापूर्वी आणखी एक घडामोड; DGP रश्मी शुक्ला 'सागर' बंगल्यावर दाखल
Devendra Fadnavis : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.
Devendra Fadnavis : शिवसेना आमदार अपात्रता निकाल (Shiv Sena MLA Disqualification Case) जाहीर होण्यासाठी काही वेळेचा अवधी राहिला असताना दुसरीकडे हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत. त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात नेमके त्याचे काय पडसाद उमटतील, यावरही राज्याच्या पोलीस खात्याचे लक्ष आहे. मंगळवारी, रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची बैठक झाली होती. जवळपास तासभर ही बैठक सुरू होती. या बैठकीत राज्य सरकारकडून मुंबईत होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या मोर्चाबाबत बैठक झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आता काही तासांमध्ये पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' बंगल्यावर दाखल झाल्या आहेत.
ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
आमदार अपात्रता निकाल सुनावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे निवास स्थान, शिवसेना शिंदे गटाचे कार्यालय, आमदारांचे कार्यालय आदी ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. मुंबईसह राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे.
असा असणार निकाल
एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत हा निकाल वाचला जाणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. परिणामी, सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि नंतर संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाईल.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे 1200 पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. परिणामी, सहा गटांतील निकालाचा सारांश केवळ वाचला जाईल. याउलट संपूर्ण निकालाची प्रत ही दोन्ही गटांना पाठवली जाईल.