(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीडमध्ये अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 20 वर्षांची सक्तमजुरी
अल्पवयीन मूकबधिर मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
बीड : बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला 20 वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणी ही मूकबधिर होती तरीही पोलिसांनी त्या नराधमाला अद्दल घडवली आहे आणि वीस वर्षाची सक्तमजुरी त्याला भोगावी लागणार आहे
पुण्यामधल्या एका संस्थेमध्ये बीड जिल्ह्यातील सोळा वर्षांची मुलगी राहत होते, ती मतिमंद होती. पत्रिका तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याची माहिती पुढे आली आणि त्यावेळी संस्थेच्या अधीक्षकांनी अशी तक्रार पुण्यातल्या बंडगार्डन पोलीस स्टेशनला केली आणि तिथून या प्रकरणाचा खुलासा झाला.
संबंधित तरुणीच्या जबाबानंतर हे प्रकरण बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले आणि या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तुकाराम कुडूक याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिरुर तालुक्यातील ते तिंतरवणी इथला तुकाराम कुडुक हा शेतामध्ये सालगडी म्हणून काम करायचा. याच दरम्यान संपर्कात आलेल्या मूकबधिर मुलीवर त्याने बलात्कार केला आणि यानंतर ती मुलगी गरोदर राहिली.
पुण्यामधल्या एका सेवाभावी संस्थेमध्ये ती राहायची, तेव्हा तपासणीदरम्यान ती गरोदर असल्याची तक्रार अधीक्षकांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये दिली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवल्यानंतर हे प्रकरण बीड ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग केले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात जानेवारी 2018 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तुकाराम कुडूकला अटक करुन त्याच्याविरोधामध्ये बीडच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयात झाली, ज्यात तुकाराम कुडूकला 20 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
करपल्लवी या सांकेतिक भाषेचा
या प्रकरणातील पीडित 16 वर्षाची मुलगी ही मूकबधिर असल्याने सांकेतिक भाषेचा वापर करुन पीडितेने न्यायालयासमोर आपली आपबिती मांडली. शाळेतील शिक्षकांची मदत घेऊन करपल्लवी या सांकेतिक भाषेचा वापर जो बोटांच्या सहाय्याने करायचा असतो तो न्यायालयामध्ये कामकाजात झाला. ज्यात न्यायालयाला मुलीकडून मोठा पुरावा मिळाला.