एक्स्प्लोर

हाताच्या प्रतीक्षेत 'पाच' जण

राज्यात अवयव दान करण्यासंदर्भातील प्रक्रियेवर  देखभाल करण्यासाठी स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था आहे. त्या खालोखाल चार विभागीय संस्था आहे.

मुंबई : कोरोनामुळे अवयवदान मोहिमेला फटका बसत असला तरी गेल्या सहा महिन्यात मुंबई विभागात 17 मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान करण्यात आले आहे आणि त्यातून मिळालेल्या अवयवाच्या आधारे प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रुग्णांना अवयवांचा फायदा झाला आहे. विशेष म्हणजे पूर्वी हाताचे सुद्धा प्रत्यारोपण होऊ शकते आणि हा अवयव दान होऊ शकतो या बद्दल फारशी माहिती नव्हती. मात्र 2014 साली  रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर गेल्यावर्षी हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया मुंबई येथील ग्लोबल रुग्णालयात  झाली आणि ती यशस्वीही झाली. त्यामुळे हात गमावलेल्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या. त्याचाच प्रत्यय म्हणजे मेंदूमृत अवयव मिळविण्याच्या  मुंबई येथील प्रतीक्षा यादीत पाच व्यक्तींनी हातच्या प्रत्यारोपणासाठी नाव नोंदणी करून ठेवली आहे. 

राज्यात अवयव दान करण्यासंदर्भातील प्रक्रियेवर  देखभाल करण्यासाठी स्टेट ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था आहे. त्या खालोखाल चार विभागीय संस्था आहे. त्यात चार  झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटी (मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद ) अशा आहेत. त्यापैकी मुंबई येथील झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटीच्या प्रतीक्षा यादीवर पाच व्यक्तींनी हात मिळावेत म्हणून आपले नाव प्रतीक्षा यादीवर नोंदणी केलेले आहे. यापूर्वी आपल्याकडे  राज्यातील झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटीच्या प्रतीक्षा यादीवर सर्वसाधारणपणे  किडनी, यकृत, स्वादुपिंड, हृदय, फ्फुफुस, या अवयवांसाठी नोंदणी होत असे. मात्र आता हातासाठी रुग्णांनी नाव नोंदविण्यास सुरुवात केली आहे. 

केरळ राज्यात 5-6 व्यक्तीवर हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच पॉण्डेचेरी आणि चेन्नई येथे अशा प्रकारे हाताच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र हाताच्या अवयवदानाविषयी लोकांमध्ये खूप गैरसमज आहे आणि मोठ्या प्रमाणात या विषयी जनजागृतीची गरज आहे.   

2014 साली  रेल्वे अपघातात मोनिका मोरे या तरुणीने दोन्ही हात गमावले होते. या तरुणीवर हाताचे प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया ऑगस्ट 28,2020 रोजी करण्यात आली. याकरिता 32 वर्षीय एका मेंदूमृत व्यक्ती कडून तिला  हे हात मिळाले असून ते चेन्नई  वरून येथे आणण्यात आले होते . दोन वर्षांपासून मोनिका आणि तिच्या कुटुंबीयांनी तिला हात मिळावेत म्हणून नाव प्रतीक्षा यादीत टाकून ठेवले होते. तो पर्यंत तिला 'प्रोस्थेसिस लावण्यात आले होते.  ही शस्त्रक्रिया परळ येथील ग्लोबल रुग्णलयात पार पडली असून त्याकरिता 15 तासाचा अवधी लागला असून 35-40 डॉक्टरांचा यामध्ये सहभाग होता. डॉ निलेश सातभाई यांनी ह्या संपूर्ण शस्त्रक्रियांचे नेतृत्व केले असून मायक्रोव्हयस्कुलर, ऑर्थोपेडिकस, प्लास्टिक सर्जन आणि ऍनेस्थेसिस्ट या विविध विषयातील तज्ञांचा या टीम मध्ये समावेश होता. तिच्या दोन्ही हातावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आज या घटनेला अकरा महिने पूर्ण झाले आहेत. 

याप्रकरणी, या हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे नेतृत्व करणारे ग्लोबल रुग्णालयातील प्लास्टिक सर्जन,  डॉ निलेश सातभाई सांगतात की, "हाताचे प्रत्यारोपण ही खूपच अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आहे. मोनिकाची शस्त्रक्रिया होऊन जवळपास 11 महिने झाले आहेत. ज्या पद्धतीने मला या शस्त्रक्रियेनंतरचा प्रतिसाद अपेक्षित होता त्याप्रमाणे मिळत आहे यामध्ये मी समाधानी आहे. अर्थात अजून मोठा पल्ला पार पडायचा आहे. पण मोनिका ज्या पद्धतीने छोट्या गोष्टी फिजोथेरपी करताना उचलत आहे, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचे आहे. 40-50  टक्के पर्यंत तिची रिकव्हरी आहे. हातात अजून जास्त प्रमाणात बळ यायला साहजिकच आणखी काही महिने लागणार आहे. पण मोनिकाची जिद्द पाहता ती लवकरच तिच्या दोन्ही हाताने तिचे काम करेल एवढी हालचाल करू शकेल.  मोनिका गेली काही दिवस सध्या नियमितपणे ग्लोबल रुग्णालयात आठवड्याला तीन वेळा फिजिओथेरपीसाठी येत आहे. 

ते पुढे असेही सांगतात की, " एकूणच कोरोना काळात अवयवदान मोहीम थोडी मंदावली होती आणि हे चित्र येथेच नाही तर संपूर्ण देशात हीच परिस्थिती आहे. त्यामुळे लवकरच ही मोहीम पुन्हा नवीन झपाट्याने सुरु होईल याची वाट पाहावी लागणार आहे  आमच्या रुग्णालयाच्या प्रतीक्षा यादीवर तीन व्यक्तींनी  हात मिळण्यासाठी नावे नोंदविली आहेत . जो पर्यंत अवयवदान होत नाही तो पर्यंत आपण काही करू शकत नाही. लोकांमध्ये हाताचे सुद्धा अवयवदान होते यासाठी मोठ्या प्रमाणात जनजगृती करणे गरजेचे आहे. मात्र आपल्याकडे हाताचे दाता फारसे  मिळत नाही. लोकं आजही शरीराच्या आतील अवयव देतात मात्र हात देत नाहीत. हाताचे प्रत्यारोपणही करता येऊ शकते हे फारच कमी लोकांना माहिती आहे. अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना वाटतं की, हात दान केलं तर मृत रुग्णाचं शरीर कसं दिसेल. मात्र हात काढल्यानंतर त्याजागी कृत्रिम हात बसवले जातात हे लोकांना ठाऊक नाही. त्यामुळे याबाबत जागरूकता निर्माण करणं गरजेचं आहे. जेणेकरून मेंदूमृत अवयव दानामध्ये रुग्णाचे हातही दान केले जातील." 

झोनल ट्रान्सप्लान्टेशन को-ऑर्डिनेशन कमिटीचे मुंबई अध्यक्ष डॉ एस के माथूर माहिती देताना सांगतात की, " ग्लोबल रुग्णलयात हाताचे प्रत्यारोपण झाल्यानंतर काही लोकांनी हात प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीत नाव नोंदविले आहे. मात्र या कोरोना काळात अवयव दान प्रक्रिया थोडी मंदावली मात्र ती आता पुन्हा जोर धरत आहेत. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पुन्हा अवयवदान मोहिम बळकट करत आहे. त्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरु आहेत."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget