Pune Crime news : हॉटेलवरच चालायचा वेश्याव्यवसाय; पोलिसांनी सापळा रचना अन् थेट छापा टाकला...
हॉटेलच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने थेट छापा टाकत कारवाई केली आहे. सहा तरुणी आणि काही महिलांची सुटका केली आहे.

पुणे : हॉटेलच्या नावाखाली चालणाऱ्या वेश्याव्यवसायाचा (Pune Crime News) पोलिसांनी पर्दाफाश केला. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने थेट छापा टाकत कारवाई केली आहे. सहा तरुणी आणि काही महिलांची सुटका केली आहे. महत्वाचं म्हणजे, यात एका बांग्लादेशी तरुणीचाही समावेश आहे. लोणीकंद परिसरामधील मनोरा लॉजिंग अँड बोर्डिंग अँड रेस्टॉरंटमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
प्रज्योत हिरीअण्णा हेगडे (वय 27, रा. पेरणे फाटा, लोणीकंद) आणि गिरीश शाम शेट्टी (वय 29) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या महिला पोलीस कर्मचारी रेश्मा कंक यांनी तक्रार दिली आहे. लोणीकंद येथील हॉटेल मनोरामध्ये मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर या ठिकाणी छापा टाकत कारवाई करण्यात आली. सुटका करण्यात आलेल्या महिलांमध्ये तीन महिला या पश्चिम बंगालच्या असल्याची माहिती आहे.
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय
काही दिवसांपूर्वी मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने चार पीडित तरुणींची सुटका केली होती. पुण्यातील वानवडी येथील साळुंखे विहारमध्ये उच्चभ्रू परिसरातील गिरमे हाईट्समध्ये 'गोल्डन टच स्पा' नावाचा मसाज सेंटर चालवण्यात येत होता. या स्पा सेंटरवर केलेल्या कारवाईत एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली होती. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. व्यवस्थापक झारणा उर्फ पिंकी गौतम मंडल (27, रा. कोंढवा) आणि सुमित अनिल होनखंडे (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे होती. तर, स्पा मालक रचना संतोष साळुंखे, लोचन अनंता गिरमे आणि सार्थक लोचन गिरमे यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पुण्यातील अवैध ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर
सध्या पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे पुण्यात सध्या पोलिसांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. त्यात रात्रीच्या वेळी गस्त घालण्यापासून तर खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यावर सापळा रचून छापा टाकण्यापर्यंत पोलीस उपाययोजना करण्यात येत आहे आणि अनेक अवैध व्यवसायावर कारवाई देखील करण्यात येत आहे. मात्र, अवैध व्यावसाय काही बंद होण्याचं नाव घेत नसल्याचं शहरात घडत असलेल्या घटनांवरुन दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
