एक्स्प्लोर

कोल्हापूर, नाशिक, साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता डीजेचा दणदणाट बंद; पुण्यात 12नंतरही डीजे सुरु

कोल्हापूर, नाशिक आणि साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता डीजेचा दणदणाट बंद झाला. पुण्यात 12 नंतरही डीजे सुरु होता. यामुळं स्वत: पोलिस आयुक्त स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं

Ganesh Visarjan Update: कोरोनाच्या (Corona Update) दोन वर्षाच्या कालखंडानंतर गणेश उत्सवाचा (Ganesh Utsav) पूर्णपणे आनंद घेत गणेश मंडळांनी गणेश उत्सव साजरा केला. मात्र काही ठिकाणी या उत्साहाला गालबोट लागल्याचंही पाहायला मिळालं. गेले दहा दिवस संपूर्ण राज्यभर एकच जयघोष होता. हा जयघोष आज देखील सुरु आहे. आज देखील काही ठिकाणी बाप्पाला निरोप दिला जात आहे. काल सकाळपासून सुरु झालेला विसर्जन सोहळा रात्री उशीरापर्यंत सुरु होता. मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी गणपती विसर्जित झाले. तर काही गणपतीच्या मिरवणुका रात्रभर सुरु होत्या, ज्या सकाळी विसर्जित झाल्या. राज्यात बऱ्याच ठिकाणी रात्री 12च्या आता विसर्जन मिरवणुका संपल्या. मात्र काही ठिकाणी नियमांचं उल्लंघन करत रात्री 12 वाजेनंतरही डीजेच्या दणदणाटासह मिरवणुका सुरु होत्या. कोल्हापूर, नाशिक, साताऱ्यात विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजता डीजेचा दणदणाट बंद करण्यात आला. तर पुण्यात 12नंतरही डीजे सुरु होता. मुंबई शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडल्या. 80 टक्के पोलिस फोर्स गणेश विसर्जनासाठी रस्त्यावर असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीत गोंधळ

पुण्यात भाजपचे माजी नगरसेवक दीपक पोटे यांचे नवनाथ गणेश मंडळ कुमठेकर रस्त्यावरून दोन तास  जागेवरून हललेच नाही. त्यामुळे पाठीमागील मंडळे पुढे जाऊ शकली नाहीत.  पाठीमागील मंडळांनी , पोलिसांनी आणि प्रशासनाने वारंवार विनंती करूनही पोटे यांचे मंडळ ऐकत नव्हते. त्यामुळे स्वतः पोलीस आयुक्त मंडळाचा डी जे बंद करण्यासाठी गेले. मात्र तरीही दीपक पोटे यांनी मंडळ अलका चौकात येताच महापालिकेच्या स्टेजवर जाऊन माईक स्वतः हातात घेतला आणि डी जे लावण्याचे आदेश दिले. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वःत महापालिकेच्या स्टेजवर गेले आणि त्यांनी डी जे बंद करण्यास सांगितले. त्यानंतर पोटे यांचे गणेश मंडळ रात्री बारा वाजता पुण्यातील अलका चौकातून विसर्जनासाठी पुढे गेले.
 
गणेश विसर्जनाच्या मिरवणुका लांबल्याने रात्री बारा वाजेपर्यंत खामगाव शहरात 28 मंडळांपैकी फक्त निम्मेच गणेश मंडळाच्या गणपतीचे विसर्जन होऊ शकले. रात्री बारापर्यंत फक्त पंधरा गणेश मंडळांचे विसर्जन झालं होतं. त्यामुळे पोलिसांनी उरलेल्या गणेश मंडळाचे डीजे बंद करून मिरवणूक आटोपत्या घेतल्या. उरलेल्या गणेश मंडळ यांचे रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जन झाले.  खामगाव शहरात 28 गणेश उत्सव मंडळाचे गणपती रात्री दोन वाजेपर्यंत विसर्जित झाले. लांबलेल्या मिरवणुका यावेळी गणेश विसर्जन उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं. जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडलं. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच मिरवणुका 12 वाजेच्या आत संपल्या होत्या. ग्रामीण भागातील मिरवणुका सुद्धा बाराच्या आधीच संपल्या होत्या. प्राथमिक माहितीनुसार औरंगाबाद जिल्ह्यात काल एकूण तीन डीजे वर पोलिसांनी कारवाई केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2022 : ही शान कोणाची 'लालबागच्या राजा'ची! लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी लाखोंचा जनसागर उसळला 

Buldana Ganpati Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकांना उशीर, वेळेच्या मर्यादेमुळे पोलिसांसमोर आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

World Fatafat Superfast News | वर्ल्ड फटाफट सुपरफास्ट बातम्या | Superfast News | ABP MajhaJob Majha | भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध पदांवर भरती सुरू, अर्ज कसा करायचा?Amol Kolhe On Swarajyarakshak Sambhaji : राजकीय दबाव होता, हे फेक नरेटिव्ह : अमोल कोल्हेCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
राज्यात शिंदे सरकार पाहिजे होतं, सर्वांना आत टाकलं असतं; मनोज जरांगेचं मोठं वक्तव्य, फडणवीसांवर नाराजी
Embed widget