एक्स्प्लोर

Shivsena: शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचं पक्षप्रमुखपद स्वीकारणार का? याची उत्सुकता

Maharashtra News: शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे. याचसाठी कार्यकारणी बोलवण्यात आली असून विविध प्रस्ताव सादर करण्यात येतील.

मुंबई :  केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

दरम्यान, आजच्या कार्यकारिणीतीत कामकाज प्रस्ताव सादर होतील. तसंच मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्याता आहे. यापुढे दिल्या जाणाऱ्या एबी फॅार्मवर कुणाच्या सह्या असतील हेही आजच्या बैठकीत ठरवलं जाईल. दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाच्या वतीने शाखांसोबतच पक्ष आणखी मजबूत करण्यावर भर असणार आहे. याचसाठी कार्यकारणी बोलवण्यात आली असून विविध प्रस्ताव सादर करण्यात येतील.

कोणते निर्णय घेतले जातील

  • मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड होईल
  •  महत्वाचे नेते सचिव ठरवतील
  • आगामी काळात एबी फॉर्मवर सह्या कुणाच्या असतील याचा निर्णय होईल
  •  ठाकरेसोबत असलेल्या आमदारांना व्हीप बजावण्यासाठी पत्र देण्यात येईल
  • घराघरात पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातील

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर एकनाथ शिंदे आता आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा आयोध्या दौरा पुढच्याच आठवड्यात नियोजित केला असल्याची माहिती मिळाली आहे. आयोध्या दौऱ्यावरून आल्यानंतर तेथील महंतांनी दिलेला धनुष्यबाण राज्यभर फिरवले जाणार आहे. 

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. शुक्रवारी निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील एखनाथ शिंदे यांना मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे. ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Matric Student Shot Dead : इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
इकडं जालन्यात दहावीचा मराठी पेपर फुटला अन् तिकडं काॅपी दाखवली नाही म्हणून एका विद्यार्थ्याने दोन विद्यार्थ्यांना रस्त्यावर गोळ्या घातल्या, एकाचा मृत्यू
Embed widget