एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात
Maharashtra Legislative Council Election : अनिल परब, निरंजन डावखरे आणि किशोर दराडे यांनी निवडणूक जिंकली आहे. प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषदेने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
![Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात Maharashtra Legislative Council Election 15 MLAs will retire from Legislative Council 3 members won the election and returned to the House Maharashtra Legislative Council election : विधान परिषदेतून आज 15 आमदार निवृत्त होणार; 3 सदस्य निवडणूक जिंकून पुन्हा सभागृहात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/8c400bfa92b16a02bf8269acc74306f31720073739078736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Legislative Council Election
Source : Other
Maharashtra Legislative Council Election : महाराष्ट्र विधान परिषदेतून(Maharashtra Legislative Council Election) आज (4 जुलै) 15 आमदार निवृत्त होत आहेत. यामधील तीन आमदार पुन्हा एकदा निवडणूक जिंकून सभागृहामध्ये परतले आहेत, तर दोन आमदार आगामी विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अनिल परब, निरंजन डावखरे आणि किशोर दराडे यांनी निवडणूक जिंकली आहे. प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषदेने निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत.
आज निवृत्त होणारे सदस्य
1) विलास पोतनीस 2) कपिल पाटील 3) महादेव जानकर 4) मनीषा कायंदे 5) भाई गिरकर 6) बाबाजानी दुर्राणी 7) नीलय नाईक 8) रमेश पाटील 9) रामराव पाटील 10) वजाहत मिर्झा
विधान परिषदेत महत्त्वाचं काय आहे?
- अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कार्यकाळ कमी होणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. दुपारी दोन पर्यंत संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील अंबादास दानवे यांच्या बाबत काय निर्णय घ्यायचा हे सत्ताधारी पक्षाची बाजु काय असेल याबाबत सभागृहाला अवगत करतील. त्यानंतर नीलम गोरे या संदर्भात निर्णय घेणार आहेत.
- राज्यात भरधाव गाडीमुळे झालेल्या अपघातांबाबत विरोधी पक्षाची लक्षवेधी असणार आहे यामध्ये कल्याणी नगर पोर्शे अपघात प्रकरण, जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथे सात मे रोजी श्रीमंतांच्या दोन मुलांनी मध्ये धुंद अवस्थेत कारचेरीस खेळताना दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जणांचा झालेला मृत्यू सहर घटना घडवून एक महिना लुटला तरी संशयीतांना अद्याप अटक नाही, नागपूर येथील वाटोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ एका कारचालकाने मद्यधुंद अवस्थेत 9 जणांना चिरडले ची 16 जून रोजी ची घटना या घटनेत दोघांचा मृत्यू पाच जण गंभीर जखमी यामध्ये एका लहान मुलीचा व मुलीचा जागीच मृत्यू या प्रकरणातील आरोपीसुद्धा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा समोर मात्र अद्याप या प्रकरणात ही कारवाई नाही. अशा तीन महत्त्वाच्या प्रकरणांवर आमदार विलास पोतनीस एकनाथ खडसे सुनील शिंदे भाई जगताप यांनी लक्षवेधी मांडली आहे.
- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्हीआयटीचाळीत असलेल्या निवासस्थानाचा आंतरराष्ट्रीय स्मारक करण्याची घोषणा मागच्या सरकारच्या काळात झाली होती मात्र तीन वर्षानंतर ही हे स्मारक कागदावरच असल्याचे समोर येणे. याबाबत भाई गिरकर यांची लक्षवेधी महत्त्वाची आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)