Santosh Deshmukh case : त्यामुळे धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंकडून पहिल्यांदाच थेट भूमिका!
पहिल्यांदाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी थेट भूमिका घेत धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे, अशी पहिल्यांदा थेट प्रतिक्रिया दिली आहे.

Santosh Deshmukh case : बीड जिल्ह्यातील मुकेश तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे विरोधकांपासून ते अंजली दमानिया यांच्यापर्यंत सर्वांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत राजीनामा घ्यावा अशी भूमिका घेतली आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्यावरती कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्या मदतीला ओबीसी संघटना सुद्धा धावून आल्याने ते एकप्रकारे राजकारण करत असल्याचा सुद्धा आरोप झाला. मात्र, आता पहिल्यांदाच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी थेट भूमिका घेत धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे, अशी पहिल्यांदा थेट प्रतिक्रिया दिली.
संपूर्ण मंत्रिमंडळाची नैतिक जबाबदारी
संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे दोषी आहेत की नाहीत याचा सरकारने तत्काळ खुलासा करायला हवा, सरकार म्हणून मुख्यमंत्रीच नाहीतर संपूर्ण मंत्रिमंडळाची नैतिक जबाबदारी असल्याचे तायवाडे म्हणाले. तायवाडे यांनी सांगितले की, चार महिने लोटून गेले तरी सरकारने धनंजय मुंडे यांची संतोष देशमुख प्रकरणांमध्ये भूमिका काय होती हे स्पष्ट न केल्याने धनंजय मुंडे दोषी असल्यासारखा संभ्रम निर्माण झाला आहे. जर धनंजय मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, दोषी नसताना राजकीय दबावापोटी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला गेला तर दोषी असल्याचा समज होईल असे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता सरकारने तत्काळ भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरुन टोलवाटोलवी
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून महायुती सरकारमध्ये टोलवाटोलवी सुरु असल्याचे चित्र आहे. पहिल्यांदा सुरेश धस यांनी मुंडेंविरोधात मोर्चा उघडला होता. मात्र, सुरेश धस यांनी स्वतः धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने भलतीच चर्चा सुरु झाली. दुसरीकडे, दोषी असल्याशिवाय कारवाई करणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या राजीनामाचा निर्णय अजित पवारांच्या गोटात ढकलून दिला आहे. ही टोलवाटोलवी सुरू असतानाच जेव्हा माझ्यावर सिंचन घोटाळ्यामध्ये आरोप झाले तेव्हा मी सुद्धा राजीनामा दिला होता असे सांगत आता अजित पवार यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर हे प्रकरण सोपवून दिलं आहे. त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या राजीनामावरून चांगलीच टोलवाटोलवी सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

