(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vinay Kore :'जनसुराज्य'च्या विनय कोरेंनी विधानसभेला पत्ता खोलला; कोल्हापूरसह राज्यात केली इतक्या जागांची मागणी
जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आगामी विधानसभेसाठी 12 ते 15 जागा लढण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी 12 ते 15 जागांची मागणी करणार असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्षांमध्ये (Mayayuti) जागावाटपावरून खणाखणी सुरू असतानाच आता महायुतीला पाठिंबा दिलेल्या छोट्या घटक पक्षांनी सुद्धा जागा वाटपामध्ये अधिकाधिक वाटा मिळण्यासाठी मागणी रेटण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापुरातील जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे आगामी विधानसभेसाठी 12 ते 15 जागा लढण्याची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी 12 ते 15 जागांची मागणी करणार असल्याचे एबीपी माझाशी बोलताना सांगितले. आमदार विनय कोरे यांनी महायुतीला 2019 पासून पाठिंबा दिला आहे.
जिल्ह्यामध्ये दहा पैकी चार जागा मिळाव्यात
येत्या दोन दिवसांमध्ये पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार विनय कोरे रणनीती निश्चित करणार आहेत. दरम्यान, राज्यामध्ये विनय कोरे यांनी विधानसभेसाठी 12 ते 15 जागांची मागणी केली असतानाच जिल्ह्यामध्ये दहा पैकी चार जागा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. विनय कोरे शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्याचबरोबर वारणा खोऱ्यासह जिल्ह्यातील सहकारामध्ये सुद्धा मोठी ताकद आहे.
सहकारी चळवळीतून कोरे यांचे नेतृत्व पुढे आलेले आहे. दूध आणि दुग्धपदार्थाचा त्यांचा‘वारणा’ ब्रँड प्रसिद्ध आहे. कोरे लिंगायत समाजाचे आहेत. त्यामुळे लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या सोलापूर, सांगली, कोल्हापूर, लातूर, नांदेड या राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांत जनसुराज्य पक्षाचा चांगला जनाधार आहे.
सांगलीत दोन जागांची मागणी
दरम्यान, सांगली जिल्ह्यातील जत व मिरज विधानसभेच्या जागेची भाजपकडे मागणी करणार असल्याचे जनसुराज शक्ती समित कदम पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी म्हटलं आहे. मिरजेत शिवसेना (शिंदेसेना) व पीपल्स रिपब्लिकन पार्टीसोबत आता जनसुराज्य या मित्रपक्षानेही मिरज विधानसभेच्या जागेवर दावा केला आहे. मिरज मतदारसंघाचे मंत्री सुरेश खाडे आमदार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या