एक्स्प्लोर

Sharad Pawar : शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग सुरू, विधानसभेच्या तोंडावर 'हे' दिग्गज वेटिंगवर? 

Maharashtra Assembly Election : गेल्या दोन निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये आउटगोईंगची अवस्था होती, आता त्यांच्या पक्षामध्ये इनकमिंगसाठी रांग लागण्याची शक्यता आहे. 

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार फटका दिला. यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाचा रोल राहिला तो शरद पवार यांचा. त्यामुळेच सध्या त्यांच्याकडे येण्याची इच्छा असणाऱ्या नेत्यांची संख्या वाढतेय. त्यातून शरद पवारांना भेटणासाठी येणाऱ्यांचीही रांग आता वाढत चालल्याचं दिसतंय. म्हणूनच नेहमी बेरजेचं राजकारण करणारे नेते अशी ख्याती असणारे शरद पवार विधानसभेला काय खेळी करणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागलेत.

सन 2014 आणि 2019 च्या निवडणुकीआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आऊटगोईंगचं प्रमाण वाढलं होतं. सगळे रस्ते भाजपच्या दिशेने जात होते. 2024 च्या लोकसभेचे निकाल लागले, मविआला अनपेक्षित मोठं यश मिळालं आणि इनकमिंग-आऊटगोईंगची दिशा बदलायला सुरुवात झाली. काँग्रेस आणि त्यातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे ओढा वाढलेला दिसू लागला. शरद पवारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढल्याचे पाहिला मिळत आहे. 

कागल विधानसभेसाठी भाजपचे समरजीत घाटगे मागील 5 वर्षांपासून तयारी करत होते. त्यांनी नुकतीच तुतारी हाती घेतली. त्यावेळी घाटगेंना निवडून द्या त्यांना मंत्री करतो अशी थेट घोषणा शरद पवार यांनी केली. त्यानंतर भाजपमधून राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या वाढायला लागल्याचं पाहायला मिळतंय.

आगामी काळात कोणते नेते तुतारी हातात घेऊ शकतात त्यावर एक नजर टाकुयात,

1) मदन भोसले- वाई विधानसभा
2) विवेक कोल्हे- कोपरगाव विधानसभा
3) बाळा भेंगडे- मावळ विधानसभा
4) बापू पठारे - वडगाव  शेरी
5) हर्षवर्धन पाटील- इंदापूर
6) प्रशांत परिचारक- पंढरपूर-मंगळवेढा
7) राजन पाटील- मोहोळ विधानसभेत वर्चस्व 
8) दिलीप सोपल- बार्शी
9) रणजीत शिंदे (बबन शिंदे यांचा मुलगा)- माढा विधानसभा
10) रमेश कदम- मोहोळ विधानसभा 

गणेश नाईक, रामराजे निंबाळकरही रांगेत?

या नावांमध्ये लवकरच आणखी भर पडण्याची शक्यता आहे. सध्या नवी मुंबईमध्ये एकहाती सत्ता असणारे गणेश नाईक असोत की फलटण आणि आसपासच्या विधानसभा मतदारसंघावर प्रभाव पाडणारे रामराजे नाईक निंबाळकर असोत, ही मंडळी देखील आगामी काळात  तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढायला मोठी मदत होणार आहे.

पवारांच्या पक्षाच इच्छुकांची गर्दी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीत 80 ते 85 जागांची मागणी केल्याची माहिती आहे. या जागांसाठी दिवसेंदिवस इच्छुकांच्या अर्जांची संख्या वाढताना पाहायला मिळतंय. 12 सप्टेंबर अखेर पक्षाकडे निवडणूक लढण्यासाठी 515 अर्ज दाखल झाले आहेत.

येत्या महिनाभरात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी अतिशय कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकच पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. पवारांच्या राष्ट्रवादीने केलेल्या पक्षांतर्गत सर्व्हेनुसार, अर्ध्याअधिक जागांवर उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेशसुद्धा शरद पवार यांनी दिले आहेत. या तयारीचा त्यांना जागावाटप झाल्यावर किती फायदा होतो याकडे आपलं लक्ष असेल. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget