एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 एप्रिल 2020 | शनिवार
1. कंटेनमेंट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉट वगळता काही दुकानं सुरु करण्याला केंद्र सरकारची सशर्त परवानगी, ई-कॉमर्सवरुन जीवनावश्यक वस्तूंना परवानगी, दारुविक्री, सलून, स्पा, मसाज सेंटर बंदच राहणार
2. राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही, हॉटस्पॉट ठिकाणी शिथिलता होणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
3. मुंबई-पुणे महानगर प्रदेश क्षेत्रातील लॉकडाऊन 3 मे नंतर शिथील होण्याची शक्यता कमी ?
4. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती नाही, सुप्रीम कोर्टाचा निर्णय, मराठा आरक्षणविरोधी दाखल याचिकेवर सरकारला नोटीस
5. धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई ; मात्र रेशन दुकानदारांना मारहाण करणं चूक, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे मत
6. शहरी नक्षलवाद आणि भीमा कोरेगाव प्रकरणी आनंद तेलतुंबडेंचा एनआयए कोर्टानं जामीन नाकारला, तेलतुंबडेंना 8 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
7. अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करत मुंबई-सांगली प्रवास; गावात पोहोचलेली तरुणी कोरोना पॉझिटिव्ह, तरुणीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
8. वारंवार सूचना देऊनही बंद ठेवणाऱ्या नर्सिंग होमचे परवाने रद्द होणार, खाजगी दवाखान्यांवरही कारवाई करण्याचे मुंबई महापालिका आयुक्तांचे आदेश
9. कोरोना संदर्भात राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात होणारे उपचार निशुल्क; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती
10. परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना योगी सरकार परत नेणार, मात्र महाराष्ट्र सरकारशी अद्याप अधिकृत चर्चा नाही
BLOG | प्लाझ्मा थेरपी वरदान ठरेल काय?, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
कोल्हापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
