Kolhapur Crime : कुत्र्याने चावा घेतल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या 'गोकुळ'च्या माजी संचालकाच्या मुलाचा दारुच्या नशेत 'तमाशा'
Kolhapur Crime : पहाटे पहाटे कुत्र्याने चावल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या गोकुळ संचालकाच्या मुलाने दारुच्या नशेत धिंगाणा घातला. तब्बल दोन तास हुज्जत घातल्याने डाॅक्टर आणि नर्सचा मनस्ताप झाला.
Kolhapur Crime : पहाटे पहाटे कुत्र्याने चावल्यानंतर सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या गोकुळ (Gokul) संचालकाच्या मुलाने दारुच्या नशेत धिंगाणा घातला. तब्बल दोन तास हुज्जत घातल्याने डाॅक्टर आणि नर्सचा चांगलाच मनस्ताप झाला. तो ‘गोकुळ’च्या माजी अध्यक्षांचा मुलगा आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कुत्र्याने चावा घेतल्यानंतर ‘सीपीआर’च्या अपघात विभागात दोन तरुण पहाटेच्या सुमारास आले होते. दोघेही दारुच्या नशेत होते. दोघांमधील एकाचा कुत्र्याने चावा घेतला होता. कुत्र्याने चावा घेतला असल्याने सीपीआरमधील डॉक्टरांनी त्यांना इंजेक्शन दिले. मात्र, इंजेक्शन देत असताना त्याची माहिती, संबंधित औषधाची बाटली द्या, असे सांगत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि नर्सशी हुज्जत घातली.
हुज्जत घालून झाल्यानंतर दारुच्या नशेतील त्या दोघा बहाद्दरांना वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, वॉर्डमध्ये दाखल केल्यानंतर संचालकांचा मुलगा निघून गेला. सीपीआरचा अपघात कक्ष 24 तास सुरु असतो. गोकुळच्या माजी अध्यक्षांचा मुलगा कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी येताच ‘डॉक्टर कुठे आहेत, इंजेक्शन कसे देणार? मला तुम्ही इंजेक्शन देऊ नका. याला बोलवा, त्याला बोलवा, अशी बडबड सुरु केली. डॉक्टरांनी तपासणी करुनही त्याची हरकत सुरु होती. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी समजावल्यानंतरही गोंधळ सुरुच ठेवला होता. हा गोंधळ सुरु असतानाच संचालकाच्या मुलाच्या पत्नीने त्या ठिकाणी आली. आम्ही नाश्ता करुन येतो, असे सांगून बाहेर गेल्यानंतर ते परत आत गेलेच नाहीत.
सीपीआरमध्ये तमाशा आणि दहशत कायमचीच
सीपीआर हे एक रुग्णालय नसून ते गरीबांसाठी आधारवड ठरले आहे. कोल्हापूर जिल्ह्यापासून बेळगावपर्यंत ते पार तळकोकणातून लोक उपचारांसाठी सीपीआरमध्ये येत असतात. उपाचाराची शाश्वती असल्याने अनेक रुग्ण पायपीट करुन सीपीआरमध्ये (cpr kolhapur) पोहोचत असतात. सीपीआरचा अपघात विभाग 24 तास कार्यरत असतो. अशावेळी बऱ्याचवेळा या विभागात कार्यरत असणाऱ्या डाॅक्टर तसेच नर्संना कधी रुग्णांच्या, तर कधी त्यांच्या नातेवाईकांचा रोषाला सामोरे जावे लागते. काहीवेळा राजकीय हस्तक्षेपही त्यांना सहन करावा लागतो. अनेक वेळा डाॅक्टरांना अरेरावी तसेच अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत. सीपीआरमधील काही गैरसोयींना मिळत नसलेला निधीही कारणीभूत असतो. मात्र, त्याचा पहिला राग येणाऱ्या रुग्णांकडून डाॅक्टरांवर काढला जातो.
इतर महत्वाच्या बातम्या