Neelam Gorhe vs Uddhav Thackeray : नीलम गोऱ्हेंविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना मैदानात
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केला.. त्यांच्या या आरोपानंतर पुण्यात ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात... उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत... आज पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर दुपारी 12 वाजता तातडीची बैठक बोलावण्यात आलीये... रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे महिला आघाडीची मातोश्रीवर बैठक होणार आहे... आजच्या बैठकीनंतर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.
दिल्लीत ९८वे आखिल भारतीय साहित्य संमेलन सुरु आहे... मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय...ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हे यांनी केलाय... त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडालीये...शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम वारंवार ठाकरेंना खोके दिल्याचा आरोप करतात, अशातच गोऱ्हेंनी देखील अशाच प्रकारचा गंभीर आरोप केलाय...दरम्यान त्यांच्या या आरोपांवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी देखील हल्लाबोल केलाय...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज





















