एक्स्प्लोर

Sharad Pawar on Shivsena: कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल; शरद पवारांचा सूचक इशारा

Sharad Pawar on Shivsena: शिवसेनेत दोन गट पडले असले, तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

Sharad Pawar on Shivsena : राज्यामधील सत्तासंघर्षात शिवसेनेत दोन गट पडले असले, तरी कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे. शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत प्रत्यय येईल, असा सूचक इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार आज कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, शिवसेनेला शिल्लक सेना म्हणणाऱ्यांना निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल. मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात फिरलो आहे, फिरत आहे, कडवा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे. येत्या निवडणुकीत जनताच सर्वांना जागा दाखवेल. त्यावेळी जनतेच्या भावना काय आहेत हे समजतील. महाविकास आघाडीमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाहीत. परंतु, आमच्यात मतभेद सुरू असतील तर ते आम्ही बैठक घेवून सोडवू. 

छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षक'च

दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्यरक्षक संबोधल्यानंतर राज्यभर आंदोलन करत भाजपने संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होतेच, पण ते धर्मवीरही होते असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात भूमिका स्पष्ट केली. पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज 'स्वराज्यरक्षक'च असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणून यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत. 

सत्ता हातात आली की जमिनीला पाय ठेवून वागायचं असतं, पण आता सत्ता आल्यानंतर असं वागत नाहीत. काही नेत्यांनी टोकाची भूमिका घेतली हे योग्य नाही, असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना पवार यांनी राज्यपालांना टोला लगावला. राज्यपाल इथं नाखूष असतील, तर आम्ही देखील त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. पहिले राज्यपाल आहेत ज्यांच्यावर सातत्याने टीका होते, जनता टीका करते. 

नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो

दरम्यान, बिहारमध्ये सुरु असलेल्या जातीय जणगणनेवरून शरद पवारांनी स्वागत केले. जातीआधारीत जनगणनेची मागणी आम्ही देखील अनेक वर्षांपासून केली आहे, लहान लहान घटक आहेत त्यांची मोजमाप व्हावीत. नितीशकुमार यांनी घेतलेल्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. राहुल गांधी यांच्या संदर्भात काही पक्षांनी टीका टिंगलटवाळणी केली गेली. राहुल गांधी यांनी एका पक्षापुरते आपला कार्यक्रम ठेवला नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते त्याच्या सोबत सहभागी झाल्याचे दिसून आलं. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईनDevendra Fadnavis Gadchiroli : गडचिरोलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विविध कामांच्या उद्धाटनCM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
Embed widget