मनोज जरांगे आज होम ग्राउंडवर, 11 वाजता शांतता रॅलीला सुरुवात होणार, जालनाकरांकडून स्वागताची जय्यत तयारी
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज होम ग्राउंडवर म्हणजेच जालन्यात रॅली होणार आहे.

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज होम ग्राउंडवर म्हणजेच जालन्यात रॅली होणार आहे. सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढत आहेत. सकाळी 11 वाजता जरांगे पाटील यांची जालना शहरात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून रॅलीला सुरुवात होणार
मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज जालना येथे दाखल होणार आहे. काल बीडच्या रॅलीनंतर अंतरवाली सराटी येथे मुक्कामी असलेले मनोज जरांगे हे 11 वाजता जालना शहरांमध्ये दाखल होतील. जालना शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा चौकातून या रॅलीला सुरुवात होणार आहे. यासाठी आयोजकांकडून तयारी करण्यात आली असून, रॅली दरम्यान तीन ठिकाणी मनोज जरांगे यांचे जेसीबी आणि मोठ्या फुलांचे हार घालून स्वागत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
बीडच्या हुंकार सभेत मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल; भुजबळांना म्हणाले, एका बुक्कीत दात पाडीन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
