एक्स्प्लोर

बीडच्या हुंकार सभेत मनोज जरांगेंचा मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल; भुजबळांना म्हणाले, एका बुक्कीत दात पाडीन

जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

बीड : राज्याचं लक्ष लागलेल्या बीडमधील मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची रॅली शांततेत पार पडली, आणि जरांगे पाटील यांच्या भाषणाने गाजली. बीडमधील (Beed) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोरुन जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन सरकार आणि विरोधक दोघांवरही हल्लाबो केला. आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal), बीडमधील मुंडे बंधु-भगिनींवर आणि मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्वांनाच बीडमधून फैलावर घेतल्याचं दिसून आलं. यावेळी, लोकसभा निवडणुकीत मी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. केवश, ज्याला पाडायचंय, त्याला पाडा असं म्हटलं होतं. मात्र, आता विधानसभेला नावं घेऊन सांगणार आहे, ह्याला पाडा म्हणून, असे जरांगे यांनी म्हटले. तसेच, विधानसभा निवडणुकांसाठी दररोज 50 जण माझ्याकडे तिकीट मागायला येतात असेही जरांगे म्हणाले.  

जरांगे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मराठा-ओबीसी आरक्षणासंदर्भाने राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीचा मुद्दा उपस्थित करत सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच, गोरगरीब मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही का, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला. 

महाविकास आघाडीवर हल्लाबोल

मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागतं का, असे म्हणत मनोज जरांगेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केला, तसेच, हिंडू द्या त्यांना, वड्यावगळ्यानी कुठं हिंडायचंय ते. मला तर वाटतंय हे दोन्हीही एकच आहेत. कारण, तू मारल्यावनी कर, मी रडल्यावनी करतो, असंच यांचं काम दिसतंय. दोघेही एकमेकांवर का ढकलतात. जर महाविकास आघाडीवाले आले नाहीत, मग सरकारची इच्छाशक्ती असेल तर सरकार का करत नाही?. महाविकास आघाडी असू किंवा महायुती असो, कधीतरी जनतेकडे बघा. ते नाही आले म्हणता, मग तुम्ही का दिलं नाही. तुमचीच इच्छा नाही आम्हाला आरक्षण द्यायची, असे जरांगे यांनी म्हटले. 

शिंदे-फडणवीसांना जरांगेंचा सवाल

टेम्पो रिक्षावर असलेल्या मराठ्यांना वाटतं माझा मुलगा नोकरी करावा, माझंही लेकरू अधिकारी झालं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना माझा सवाल आहे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्यायचं नाही का?. शिंदेसाहेब तुम्हालाही सांगतो, आमचे आणखी किती बळी तुम्ही घेणार आहात. आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आमच्या मराठा बांधवांचा एकदा उंबरा ओलांडला, तुम्हाला काळोख आणि काळोखच दिसेल, असे जरांगे यांनी म्हटले. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं, माझा समाज मोठा व्हावं, यासाठी मुलांनी, बापांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आया-बहिणीचं कुंकू पुसलंय. घरातला माणूस गेला, आरक्षणाने घात केला, उभा संसार जाळात होरपळतोय, असे म्हणत जरांगे पाटील यांनी राज्यकर्त्यांना सवाल केला आहे. 

कुणबी म्हणून मराठा समाजाला ओबीसीत का नाही?

तुम्ही फक्त मराठ्यांकडून खुर्च्या घेणार आणि तुम्हाला हवं तेच करणार. 83 क्रमांक हा कुणबी म्हणून आहे. ओबीसीमध्ये 180 जाती होत्या, पण आता 350 च्या जवळ जाती आहेत, ज्या जाती पोटजाती म्हणून ओबीसीमध्ये घेतल्या आहेत. मग, मराठा समाजालाही ओबीसीत का घेत नाहीत, असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

ओबीसी नेत्यांवर प्रहार

माझ्या जातीवर झालेला अन्याय मी नाही सहन करु शकत. ज्याला पक्षाकडून बोलायचंय त्याने बोला, मी माझ्या जातीकडूनच बोलणार. माझ्या मराठ्यांना तुम्ही जातीवादी ठरवलं कसं?. छगन भुजबळने ओबीसीचे सगळे नेते गोळा केले आणि माझ्याविरुद्ध बोलायला सुरू केले, त्याला जातीवाद म्हणत नाहीत का, असा सवाल जरांगे यांनी विचारला. अंबडला एल्गार मेळावा झाला, त्यामध्ये गोळा केलेले ओबीसी नेते सगळे म्हणाले, आम्ही कोयत्याने पाय तोडीत असतो. पण पाय तोडणारा अजून माझ्यापर्यंत आला नाही. 

मुंडे बंधु-भगिनींवर निशाणा

तुम्हाला राज्यात किंग राहायचे आहे, जिल्ह्यात किंग राहायचं आहे, मग मराठ्यांना गोड बोला. तुमची जात एक झाली, आम्हाला आनंद झाला. पण, माझी जात एक झाली, मग तुमच्या का पोटात दुखायला लागलं. तुम्ही जातीवाद करणार, तुम्ही मतं मराठ्यांची घेणार, तुम्ही शिरुर, आष्टी, गेवराईजवळच्या पोरांना मारणार. पण, आमची शांतता आणि संयम आहे, म्हणजे आम्ही भीतोत असं तुम्हाला वाटतं का?, असे म्हणत मुंडें बंधु-भगिनींवर हल्लाबोल केला. आम्ही क्षत्रिय मराठा आहोत, आम्हाला वाटतं लहान भाऊ आहेत. पण, निवडणूक होईपर्यंत शांत राहा, संयम राहा.. असं ते म्हणाले होते. आता, आपणही 2-3 महिने संयम धरु, विधानसभेला सगळेच पाडू. बीड जिल्ह्यात मराठ्यांवर अन्याय करणारा एकही निवडून ययेऊ द्यायचा नाही, असे आवाहनही मराठा समाजाला केले. आपल्या विचारांचा एखादा ओबीसी निवडून दिला तरी चालतो, पण मराठ्यांना विरोध करणारा चालणार नाही, असे म्हणत जरांगेंनी नाव न घेता पुन्हा एकदा मुंडेंवर हल्लाबोल केला.  

छगन भुजबळ जातीवादाने पछाडलेला माणूस

आमचा एकमेव विरोधक छगन भुजबळ आहे. बाकी ओबीसी नेत्यांना आम्ही विरोधक मानत नाही. कारण, छगन भुजबळ या सगळ्यांचा मुकादम आहे, असे म्हणत जरांगेंनी बीडमधूनही छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. तसेच, भुजबळांनी केलेल्या शेरोशायरीवरुन, एका बुक्कीत दाड पाडीन, असे म्हणत भुजबळांवर हल्लाबोल केला. तसेच, छगन भुजबळ तुझ्या जे जे नादी लागले, त्यांना मराठ्यांनी खुटा ठोकलाय. छगन भुजबळ जातीवादाने पिछाडलेला माणूस आहे, मराठ्यांविरुद्ध जातीवाद पसरवणाऱ्या लोकांना यापुढे साथ द्यायची नाही. छगन भुजबळने सर्व ओबीसी नेते एकजूट केले आहेत. मराठ्यांनी आता एक व्हा, एकजूट राहा एवढीच विनंती मी तुम्हाला करतो, असे जरांगे यांनी म्हटले. सगळ्या पक्षातील मराठ्यांनी एकजूट व्हा, कारण सगळ्याच पक्षातील मराठ्यांना आरक्षण पाहिजे आहे, असेही जरांगे यांनी म्हटले. 

मराठा बांधवांना दोन विनंत्या

माझ्या बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांना दोन विनंत्या आहेत. पहिलं काम आपल्या गोरगरिबांवर कोणी अन्याय करत असेल तर त्याच्या मदतीला जावा, केवळ बघ्याची भूमिका घेऊ नका. गरीब मराठ्यांनी मी गरीब आहे, असं म्हणायचं नाही. आपण गरीब मराठ्यांनी एकमेकांच्या मदतीला जायचं आहे.

मतदान करताना मराठ्यांनी एकठ्ठ्या करायचं. मी सांगितलं कोणाला पाडा, कोणाला निवडून आणा. जे हुश्शार होते, त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला. पण, काहींनी मतदान न केल्यामुळे 20 हजार आणि काहींनी मी नाव न घेऊन सांगितल्यामुळे कुणाला मतदान करावं हे त्यांना कळालं नाही, त्यांनी 10 हजार मतदान दुसऱ्यालाच केलं. आता, यावेळी मी डायरेक्ट नाव घेऊन सांगणार आहे, यांना पाडा. दररोज 50 एक जण मला तिकीट मागायला येतात. 70 वर्षे त्या भंगाराला दिलं, यंदा एक शिक्का मतदान हाणायचं. कोणलाही करायचं आणि 100 टक्के मतदान करायचं, असे आवाहन मनोज जरांगे यांनी बीडमधून मराठा समाजाला केलं आहे.

हेही वाचा

बीडमध्ये मराठ्यांची त्सुनामी, रॅलीली किती गर्दी?; मनोज जरांगे म्हणाले, मी नतमस्तक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवलं तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
''तानाजीराव जादूगार आहेत, उठाव केल्यानंतर माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा होते''; शिंदेंनी सांगितली बंडाची आठवण
Ramdas Athawale : वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
वाजवूया मविआचे बारा, मोदींच्या सभेत आठवलेंची भन्नाट कविता; उद्धव ठाकरेंसह शरद पवारांनाही टोला
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
वंचितचा अंदाज चुकला, हवामान अभ्यासक पंजाबराव डख आता भाजपात; 'या' आमदारासाठी प्रचाराच्या मैदानात
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Embed widget