(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : आता इराणी आणि चायनीज लसूण बाजारात, जळगाव मार्केटमध्ये देशी लसणाचे भाव पडले!
Jalgaon News : कांदा आणि टोमॅटोच्या दरामध्ये भाव वाढ झाल्यानंतर आता लसणाच्या दरात वाढ झाल्याचं चित्र बाजारपेठांमध्ये आहे.
जळगाव : भारतीय लसणाला (Garlic) समाधाकारक भाव मिळत नसल्याचं चित्र नेहमीच पाहायला मिळतं. त्यातच भाव नसताना सरकारकडून इराणी लसणाची आयात सुरु करण्यात आलीये. त्यामुळे लसणाच्या दरामध्ये पुन्हा एकदा घट झाल्याचं चित्र आहे. म्हणूनच सरकारच्या या आयात धोरणाचा शेतकऱ्यांकडून (Farmer) पुन्हा एक निषेध होत असल्याचं पाहायला मिळतयं. काहीच दिवसांपूर्वी टोमॅटो (Tomato) आणि कांद्याच्या (Onion) दरमध्ये वाढ झाली होती. पण त्याची आयात करुन त्याचे दर घसरवल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला.
दरम्यान हाच प्रकार सरकार लसणाच्या बाबतीत करत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. सध्या बाजारापेठांमध्ये भारतीय लसणाला समाधानकारक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. पण आता बाजारात इराणी आणि चायनावरुन लसूण बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने पुन्हा एकदा भारतीय लसणाला भाव मिळणार नसल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय. तसेच इराणचा विदेशी लसूण जळगावच्या बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने स्थानिक दरात आणि विक्रीत घसरण झाल्याचं व्यापऱ्यांचं म्हणणं आहे.
कसा असतो विदेशी लसूण?
जळगाव बाजार समितीमध्ये सध्या मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील बाजार समितीकडून या इराणी लसणाची आवाक होत आहे. त्यामुळे हा लसूण खायला तितका चवदार नसतो. पण तरीही हा लसूण भारतीय लसणापेक्षा हा कांदा मोठा आणि सुंदर असतो. त्यामुळे त्याच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. शिवाय याचे दरही भारतीय लसणाच्या दराइतकेच आहेत. त्यामुळे ग्राहक त्याला पसंती देत असल्याचा व्यापारी सांगत आहेत.
सरकारकडून हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत कोणत्याही शेतमालाचा भाव वाढला की सरकार तो पाडण्यासाठी विदेशी माल आयात करते. तसेच निर्यात शुल्क देखील वाढवते, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते एस.बी. नाना पाटील यांनी केलाय. तर आता आपल्या शत्रू राष्ट्राकडून लसणाची आयात करुन त्याचे दर पाडले जात असल्याचा आरोप शेतकरी सध्या करत आहेत.
आधीच शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला त्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळे आता हा विदेशी लसूण बाजारात आल्याने शेतकऱ्याचं अधिक नुकसान होणार असल्याचं शेतकरी संघटना नेते एस बी नाना पाटील यांनी म्हटलं आहे. तर आता शेतकऱ्यांच्या या मागणीवर सरकार कोणती पावलं उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर शेतकऱ्यांच्या लसणाला भाव मिळणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
विदर्भात बळीराजा चिंतेत, सोयाबिनवर येलो मोझेक, तर कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव, यंदा उत्पादन घटणार