एक्स्प्लोर

Narendra Modi : झेलेन्स्कींचं निमंत्रण स्वीकारलं, नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय, यूक्रेनचा दौरा करणार, रशियाच्या भूमिकेकडे लक्ष

Narendra Modi Poland and Ukraine Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 ऑगस्टला यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. झेलेन्स्की यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत मोदी दौऱ्यावर जाणार आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विदेश दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑगस्टपासून दोन देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. विशेष बाब म्हणजे या दौऱ्यात नरेंद्र मोदी यूक्रेनचा (Narendra Modi Ukraine Tour) दौरा देखील करणार आहेत. मोदींचा यावेळचा विदेश दौरा पोलंड आणि यूक्रेन या दोन देशांमध्ये असेल. नरेंद्र मोदी प्रथम पोलंडनंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत पुष्टी करण्यात आल्याची माहिती आहे.  

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर भारतानं दोन्ही देशांनी युद्धाचा मार्ग वापरण्याऐवजी सांमजस्यानं अन् चर्चेनं विषय सोडवावा अशी भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला होता. आता नरेंद्र मोदी पोलंड आणि यूक्रेनचा दौरा करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.  नरेंद्र मोदी यूक्रेनचा दौरा करत असल्यानं रशिया काय भूमिका घेणार हे देखील पाहावं लागणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या सचिव तन्मया लाल यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. पोलंड आणि यूक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या आमंत्रणानंतर नरेंद्र मोदी या देशांचा दौरा करणार आहेत. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क आणि यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर झेलेंस्की यांनी मोदींना आमंत्रण दिलं होतं. 

नरेंद्र मोदी  रशिया यूक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. रशिया युक्रेन युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहिलाच युक्रेन दौरा असल्यानं जगभरातील नेत्यांचं मोदींच्या दौऱ्याकडे लक्ष असेल.  पंतप्रधान मोदी 23 ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जातील तत्पूर्वी ते 21 आणि 22 ऑगस्टला पंतप्रधान पोलंड देशाचा दौरा करणार आहेत. 

भारतानं रशिया आणि यूक्रेन यांच्यातील वाद हा वाटाघाटी आणि चर्चेनं सोडवावा अशी भूमिका घेतलेली आहे. वाटाघाटी  आणि चर्चेच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित केली जाऊ शकते, अशी भारताची भूमिका आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूक्रेन दौऱ्याकडे जगभरातील प्रमुख देशांचं लक्ष असेल. रशियानं फेब्रुवारी 2022 मध्ये यूक्रेनवर आक्रमकण केलं होतं. यूक्रेनला नाटोचं सदस्यपद देण्यात येऊ नये यासाठी रशियानं आक्रमक भूमिका घेतली होती. नाटोचं सदस्यपद यूक्रेनला मिळाल्यास नाटोच्या सदस्य देशांचं सैन्य देखील रशिया यूक्रेन सीमेपर्यंत पोहोचू शकत, त्यामुळं रशियाचा यूक्रेनच्या नाटोच्या सदस्यपदाला विरोध आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदींचा यूक्रेनचा दौरा 23 ऑगस्ट रोजी असेल. भारताचे पंतप्रधान 30 वर्षानंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर जात आहेत. तर, 45 वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

इतर बातम्या : 

Udaipur Violence : चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्याने दम तोडला; उदयपूरमध्ये तणाव, इंटरनेटही बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget