डोळ्यात अंगार, शूटिंगसाठी येताच दिसायची 'औरंगजेबा'ची दहशत, अक्षय खन्नाने छावातील औरंग कसा उभा केला? पाहा व्हिडीओ
Chhaava Film : विकी कौशल प्रमुख भूमिकेत असलेल्या छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या मेकिंगचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.

Chhaava Film : छावा या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. अजूनही प्रदर्शनाच्या 27 व्या दिवशीदेखील या चित्रपटाचा बोलबाला सुरूच आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या अनेक गोष्टी समोर येत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग नेमके कसे झाले? हे सांगण्यासाठी त्याच्या मेकिंगचे व्हिडीओ आता अपलोड करण्यात येत आहेत. असाच एक व्हिडीओ आता यूट्यूबवर आला असून यात अक्षय खन्नाने (Akshaye Khanna) बादशाह औरंगजेब (Aurangzeb) हे पात्र कसे साकारले ते दाखवण्यात आले आहे.
मॅडॉकने प्रसिद्ध केला फिल्म मेकिंगचा व्हिडीओ
मॅडॉक फिल्म्सने यूट्यूबवर 12 मार्च रोजी 2 मिनिट 15 सेकंदांचा एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओत छावा चित्रपटाचे शूटिंग कसे करण्यात आले, हे दाखवलेले आहे. चित्रपटाच्या शेवटच्या सीनचे शूटिंग कसे झाले? त्यासाठी कशाप्रकारे रंगभूषा, वेशभूषा करण्यात आली होती? ते दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे अक्षय खन्नाने औरंगजेब कशा पद्धातीने साकारलेला आहे, हेही दाखवलेले आहे.
अक्षय खन्नाने औरंगजेब कसा साकारला?
या चित्रपटात अक्षय खन्नाने केलेल्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. त्याने सिनेमात हुबेहुब औरंगजेब साकारला आहे, असे सिनेरसिक म्हणत आहेत. त्याच्या डोळ्यांत एका बादशाहाचा थाट, औरंगजेबाचा राग तसेच त्याच्या देहबोलीत औरंगजेबाची दहशत हुबेहुब दिसत असल्याचं म्हटलं जातंय. सध्या समोर आलेल्या व्हिडीओत अक्षय खन्ना आपले डायलॉग्स बोलताना दिसतोय. तसेच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या सूचनादेखील ऐकताना दिसतोय.
गदर-2, स्त्री-2 चित्रपटांना टाकलं मागे
दरम्यान, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. प्रदर्शनाच्या 27 व्या दिवसानंतरही हा चित्रपट सिनेमागृहांत चालू आहे. या चित्रपटाने स्त्री-2, गदर-2 या चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. छावा हा प्रदर्शनाच्या 27 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट ठरला आहे. पुष्पा-2 हा चित्रपट प्रथम क्रमांकावर आहे. छावाने गदर-2 आणि स्त्री-2 या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
हेही वाचा :























