छावाची तुफान हवा, कमाईत स्त्री-2, गदर-2 ला पछाडलं, 27 व्या दिवशी थेट पुष्पा-2 ला दिली धडक; नेमके किती कोटी कमावले?
Chhaava Box Office Collection Day 27 : छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाने तर आता गदर-2 आणि स्त्री-2 या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.

Chhaava Box Office Collection Day 27 : या वर्षी सिनेमागृहांत प्रदर्शित झालेला छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतोय. प्रदर्शित होऊन 27 दिवस झालेले असले तरी या चित्रपटाला पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक बड्या चित्रपटांना मागे टाकलं आहे. याच काळात अक्षय कुमारच्या स्काय फोर्स या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. मात्र छावा चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद हा कल्पनेच्या पलीकलडील आहे. दरम्यान, या चित्रपटाने 27 व्या दिवशी स्त्री-2 आणि गदर-2 या दोन्ही चित्रपटांना मागे टाकत नवा विक्रम रचला आहे.
चार आठवड्यांपासून जोरदार प्रतिसाद
छावा या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 27 व्या दिवशी अनेक विक्रम मोडीत काढल आहेत. सध्यातरी छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिससचेच राज्य आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला असून महाराष्ट्रात तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला होता. मधल्या काळात अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. लोकांनी मात्र याच चित्रपटाला पसंती दिल्याचं दिसतंय. चार आठवडे झाले, हा चित्रपट अजूनही सिनेमागृहांतून उतरलेला नाही. या चारही आठवड्यात चित्रपटाने मोठी कमाई केली आहे.
छावाने 27 व्या दिवशी किती कमाई केली?
‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 219.25 कोटी रुपये कमवले होते.
दुसऱ्या आठवड्याला 180.25 कोटी रुपये कमवले होते.
तिसऱ्या आठवड्याला या चित्रपटाने 84.05 कोटी रुपयांची कमाई केली होती.
22 व्या दिवशी या चित्रपटाने 8.75 कोटी तर 23 व्या दिवशी 16.75 कोटी रुपये कमवले होते.
24 व्या दिवशी छावा चित्रपटाने 10.75 कोटी तर 25 व्या दिवशी या चित्रपटाने सहा कोटी रुपये कमवले होते.
26 व्या दिवशी या चित्रपटाने 5 कोटी रुपयांची कमाई केली होती.
सॅकनिल्कच्या आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार छावा चित्रपटाने बुधवारी म्हणजेच 27 व्या दिवशी 4.75 कोटी रुपये कमवले आहेत.
या चित्रपटाची एकूण कमाई आता 535.55 कोटी रुपये झाली आहे.
स्त्री-2, गदर-2 चित्रपटाचे रेकॉर्ड मोडले
छावा या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 27 व्या दिवशी पुष्पा- 2 चित्रपट वगळता अन्य सर्व चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. छावा चित्रपट 27 व्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पुष्पा-2 चित्रपटाने 27व्या दिवशी एकूण 6.25 कोटी रुपये कमवले होते. छावा चित्रपटाने 4.75 कोटी रुपये कमवले आहेत. दुसरीकडे स्त्री 2 या चित्रपटाने प्रदर्शनाच्या 27 व्या दिवशी एकूण 3.1 कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. गदर-2 चित्रपटाने 27 व्या दिवशी 2.75 कोटी रुपये कमवले होते.
हेही वाचा :























