...अन् लक्ष्मण उतेकर 'धाकल्या धन्या'च्या गळ्यात पडले, शूटिंग सुरू असतानाच छावाच्या दिग्दर्शकाची अशी कृती ज्याने विकी कौशलही भावुक!
Chhaava Film Making : छावा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत लक्ष्मण उतेकरांनी विकी कौशलला मिठी मारली आहे.

Chhaava : छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारलेला छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. हा चित्रपट अजूनही सिनेमागृहांत चालू असून तो रोज कोट्यवधी रुपये कमवतो आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनानंतरच्या 27 व्या दिवशीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याने अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही व्हिडीओ समोर येत आहेत. असाच एका चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडीओ मॅडॉक फिल्म्सने यूट्यूबवर अपलोड केला असून छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या विकी कौशला भावुक होत मिठी मारली आहे.
विकी कौशलने घेतली मेहनत
अभिनेता विकी कौशलने छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे. संभाजी महाराज यांची भूमिका करताना या पात्राला पुरेपूर न्याय कसा देता येईल, यासाठी विकी कौशलने शूटिंगदरम्यान तसेच शूटिंगच्या अगोदरही खूप मेहनत घेतली आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान विकी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची प्रत्येक गोष्ट लक्ष देऊन ऐकत होता. तसेच दिग्दर्शकाला अपेक्षित असणारा अभिनय करण्यासाठी त्याने जीवाचे रान केले आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या कामाची सिनेरसिकांनी खूप प्रशंसा केली आहे.
...अन् लक्ष्मण उतेकर विकी कौशलच्या गळ्यात पडले
मॅडॉक फिल्म्सने एक व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये छावा चित्रपट कसा तयार करण्यात आला हे थोडक्यात दाखवण्यात आले आहे. सिनेमाच्या शूटिंगचे प्रसंगही यात दाखवण्यात आले आहेत. या व्हिडीओत काही ठिकाणी विकी कौशल लक्ष्मण उतेकर यांच्या सूचना ऐकताना दिसतोय. तर काही ठिकाणी बादशाहा औरंगजेब साकारणारा विकी कौशलही उतेकर यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करताना दिसतोय. व्हिडीओच्या शेवटी उतेकर कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसत आहेत. 'राजे तुमचे खूप खूप धन्यवाद. मी छावा चित्रपटाची ज्या पद्धतीने कल्पना केली होती, अगदी त्याच पद्धतीने सगळं काही घडलं आहे,' असं लक्ष्मण उतेकर विकी कौशलला म्हणताना दिसतोय. त्यानंतर त्यांनी विकी कौशलला मिठी मारली आहे. विशेष म्हणजे उतेकर भावुक झाल्याचे दिसताच विकी कौशलनेही त्यांची गळाभेट आभार व्यक्त केले.
500 कोटींपेक्षा जास्त केली कमाई
दरम्यान, विकी कौशलसोबतच या चित्रपटात काम करणाऱ्या अक्षय खन्नाच्या भूमिकेचेही तेवढेच कौतुक होत आहे. त्याने या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका केली आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने महाराणी येसुबाई यांची भूमिका केली आहे. तिच्याही कामाचे खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालूच आहे.
हेही वाचा :























