Morning Headlines 27th May : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
दिल्लीत नीती आयोगाची बैठक; सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार, केजरीवालांसह, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमारांचा बैठकीवर बहिष्कार
नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत. सहभागी होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. (वाचा सविस्तर)
छत्तीसगढमध्ये नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक, बीजापूर पोलिसांची कारवाई
छत्तीसगढमध्ये दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक करण्यास यश मिळाले आहे. बीजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. छत्तीसगढच्या बीजापूर पोलिस आणि DRG च्या नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली आहे. या अटकेत बीजापूरच्या मूलवासी बचाव नेत्याचा ही सहभाग आहे. (वाचा सविस्तर)
Railway Without Ticket: विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेची बंपर कमाई; एका वर्षात वसूल केले 2200 कोटी रुपये
देशभरात स्वस्त आणि चांगला सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय म्हणून रेल्वेकडे (Indian Railway) पाहिले जाते. देशभरात असलेल्या रेल्वेच्या जाळ्यांमुळे प्रवाशांकडून रेल्वेला पसंती दिली जाते. जगभरात सर्वाधिक रेल्वे प्रवाशांची संख्या भारतात आहे. मात्र, त्याच वेळेस विनातिकीट प्रवास (Without Ticket Travelling) करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मागील आर्थिक वर्षात रेल्वेला विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून मोठी कमाई झाली आहे. (वाचा सविस्तर)
जर्मनीत आर्थिक मंदी, जगातील चौथी अर्थव्यवस्था संकटात
युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून जर्मनीकडे पाहिले जाते. जर्मनी जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून जर्मनी मंदीच्या (Germany Recession) गर्तेत अडकली आहे. जर्मनीच्या जीडीपीचे (Germany GDP) आकडे आलेत आणि यावर शिक्कामोर्तब झालं आहे. सोबतच महागाईमुळे नागरिक देखील हैराण झाल्याचं चित्र दिसतंय. (वाचा सविस्तर)
मदुराई मठाचे मुख्य पुजारी पंतप्रधान मोदींकडे सेंगोल देणार; 2024 च्या निवडणुकीविषयी पुजारी म्हणाले....
संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्धाटनाची दिल्लीत आता जोरदार तयारी सुरू झाल्याचं दिसून येतंय. रविवारी होणाऱ्या या कार्यक्रमाच्यावेळी मदुराई अधानमच्या 293 व्या मुख्य पुजाऱ्यांच्या वतीने 'सेंगोल' राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सूपूर्त करण्यात येणार आहे. पण त्याआधी मदुराई अधानमचे मुख्य पुजारी हरिहरा देसिका स्वामीगल यांनी एक वक्तव्य केलं आहे (वाचा सविस्तर)
प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी वास्तू, PM मोदींचे ट्वीट; पाहा अशी आहे नवीन संसद
भारतीय संसदेच्या नव्या इमारतीचे (New Parliament Building) उद्घाटन येत्या 28 मे रोजी पार पडणार आहे. संसदेच्या या नव्या इमारतीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, असे पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ट्वीट करून म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत नव्या संसदेच्या इमारतीचे अंतरंग उलगडून दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. (वाचा सविस्तर)
महिन्यातला शेवटचा शनिवार 'या' राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज शनिवार हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या यांसह सर्व राशींना सुख आणि समृद्धी मिळेल. या दिवशी कोणत्या राशीला मिळेल यश? काय म्हणतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. (वाचा सविस्तर)
सेंट पिटर्सबर्गची स्थापना, गांधी हत्येच्या खटल्याला सुरुवात आणि जवाहरलाल नेहरू यांचे निधन; आज इतिहासात
भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. इतिहासात आजच्या दिवशी महात्मा गांधी यांच्या हत्येच्या खटल्याची सुरुवात झाली. नथूराम गोडसे याने 30 जानेवारी 1948 रोजी त्यांची हत्या केली होती. तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे निधन 27 मे 1964 रोजी झालं होतं. यासह इतर महत्त्वाच्या घटना खालीलप्रमाणे (वाचा सविस्तर)