Special Report Walmik Karad Property : खंडणीच्या जोरावर उभं केलेलं आकाचं सम्राज्य, कराडचं घबाड
Special Report Walmik Karad Property : खंडणीच्या जोरावर उभं केलेलं आकाचं सम्राज्य, कराडचं घबाड
वाल्मिक कराडच्या मालमत्तेची माहिती एबीपी माझाने दिली होतीच पण मस्साजोग हत्याकांडातील आरोपपत्र आत्तापर्यंत माहिती नसलेली प्रॉपर्टीही समोर आलीय. अल्पकाळात जमवलेली ही कोट्यवधींची मालमत्ता पाहून डोळे विस्फारतात. यासोबतच समोर आले आहेत आरोपींनी संतोष देशमुख यांना मारहाण करताना ज्या मोकारपंती व्हाट्सप ग्रुपवर व्हिडिओ कॉल केले होते, त्याचे डिटेल्स. गुन्हेगारी, खंडणीखोरी आणि राजकारण यांचं मन विषण्ण करणारं चित्र आरोपपत्रातून समोर येतंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
संतोष देशमुख हत्येसाठी खंडणी हे कारण महत्वाचं होतं. खंडणीखोरीची पाळमुळे खूप खोलवर आणि खूप दूरवर पसरलेली असतात. याच खंडणीच्या जोरावर अनेकांनी आपलं साम्राज्य उभं केलंय. वाल्मिक कराड त्यातीलच एक. आरोपपत्रात वाल्मिक कराडची आत्तापर्यंत समोर न आलेली डोळे विस्फारणारी प्रॉपर्टी समोर आलीय.
वाल्मिक कराडची संपत्ती केजमध्ये २५०० चौरस फुटांचा प्लॉट आणि बंगला, किंमत १ कोटी ६९ लाख दगडवाडीमध्ये शेतजमीन, किंमत ४८ लाख २६ हजार मौजे तडोळी इथे १२ हेक्टर शेतजमीन, खरेदी किंमत ६ लाख परळीत ३ हेक्टर शेतजमीन, खरेदी किंमत २५ लाख परळी रोडवर अंबाजोगाईत ३८० चौ.मी. रहिवासी बांधकाम अंबाजोगाईतच ४१९ चौ.मी. रहिवासी बांधकाम दगडवाडीत स्टोन क्रेशर युनिट पांगरीत खुला प्लॉट दगडवाडी गावात ४८ लाखांची शेतजमीन






















