Niti Aayog Meeting: दिल्लीत नीती आयोगाची बैठक; सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार, केजरीवालांसह, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमारांचा बैठकीवर बहिष्कार
Niti Aayog Meeting: केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या बैठकीवार बहिष्कार टाकला आहे.
Niti Aayog Meeting: नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत. सहभागी होणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांसह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
केंद्र आणि राज्य सरकारमधील संघर्षामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी या बैठकीवार बहिष्कार टाकला आहे. पंतप्रधान जर सुप्रिम कोर्टाचे आदेश जुमानत नसतील तर सामान्य लोकांनी न्यायासाठी कोणाकडे जायचं असं केजरीवाल म्हणतात. सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रगती मैदानात ही बैठक होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत सामिल होण्यासाठी दिल्लीत रात्री उशीरा दाखल झाले आहेत.
बैठकीत आठ प्रमुख विषयांवर चर्चा
निती आयोगाच्या आजच्या बैठकीचा अजेंडा पुढील 25 वर्षांत म्हणजे 2047 सालापर्यंत भारत कसा असणार हा आहे. परंतु बैठकीपूर्वीच भारत विखुरलेला दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी साडेनऊ वाजता या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत आठ प्रमुख विषयांवर आज चर्चा होणार आहे.
कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा?
आज होणाऱ्या या बैठकीत एमएसएमई, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि , कौशल्य विकास आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा या विषयांवर भर देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बैठक विकसित भारतावर चर्चा होणार आहे.
काँग्रेसचे चार मुख्यमंत्री सहभागी होणार
या बैठकीसाठी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे चार राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत भाजप आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष आणि समविचारी पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीसह इतर विरोधी पक्षांच्या बहिष्काराच्या घोषणेवर भाजप नेत्यांचे काय म्हणणे आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हे ही वाचा: