एक्स्प्लोर
गोऱ्या रंगामुळे 'या' अभिनेत्याच्या करिअरला लागलं ग्रहण; फिल्म मिळताना नाकीनऊ, म्हणाला, "ऋतिक-सैफला संधी मिळते, तर मला का नाही?"
बॉलिवूड अभिनेत्याचा गोरा रंग त्याच्या करिअरला ग्रहण लागला आहे, असं आम्ही नाही खुद्द तो अभिनेताच म्हणत आहे. या अभिनेत्याचं म्हणणं आहे की, त्याच्या गोऱ्या रंगामुळे त्याला चित्रपट मिळाले नाहीत.
Bollywood Actor Neil Nitin Mukesh
1/10

फिल्मी बॅकग्राउंड असणाऱ्या या अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये करिअर घडवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याच्या पहिल्या चित्रपटाचं फिल्म क्रिटिक्सनी कौतुक केलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये शानदार रोल प्ले केला. पण, त्यांना इंडस्ट्रीमध्ये खास ओळख निर्माण करता आली नाही. यासाठी अभिनेता त्याच्या गोऱ्या रंगाला कारणीभूत ठरवतो.
2/10

आम्ही ज्या अभिनेत्याबद्दल सांगत आहोत, तो दुसरा, तिसरा कुणी नसून नील नितीन मुकेश आहे. नीलनं आपल्या कारकिर्दीची सुरुवात दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या 'जॉनी गद्दार' (2007) या चित्रपटातून केली.
3/10

हिंदी रशला दिलेल्या मुलाखतीत बोलताना, नील नितीन मुकेशनं त्याच्या गोऱ्या रंगामुळे त्याला इंडस्ट्रीत कमी संधी मिळाल्याचं म्हटलं आहे.
4/10

150 कोटी लोकांच्या लोकसंख्येत अभिनेता स्वतःला युनिक समजतो. पण, याचा अर्थ असा नाही की, तो सर्वसामान्य माणसाच्या नजरेत फिट बसत नाही.
5/10

गोलमान अगेनमध्ये झळकलेल्या अभिनेत्यानं पुढे म्हटलं की, आज गोऱ्या त्वचेला काळा रंग देऊन दाखवलं जातं. टेक्नीक आणि मेकअर एवढा अॅडव्हान्स झालंय की, कोणाचंही खरं रुप पूर्णपणे बदलणं शक्य झालं आहे. कोणाचाही चेहरा बदलता येऊ शकतो, पण तुम्ही अॅक्टिंगही पाहा ना... तुम्ही संधी तर द्या..."
6/10

नील नितीन मुकेशनं बोलताना जॉनी गद्दार आणि जेल मधल्या त्यांच्या भुमिकांचा संदर्भ दिला. त्यावेळी त्यानं मी सर्वसामान्य माणसाचा अवतारही घेऊ शकतो, या गोष्टीवर जोर दिला.
7/10

नीलनं सैफ अली खान आणि हृतिक रोशन सारख्या कलाकारांना ब्राउनफेसिंगची गरज असलेले रोल्स ऑफर झाले. ज्याला प्रेक्षकांनी स्वीकारलं.
8/10

'हिसाब बराबर'मध्ये नीलनं एका सामान्य बँकरची भूमिका साकारली आहे. नीलनं जोर देऊन सांगितलं की, तो स्वतःला लोकांचा माणूस म्हणून पाहतो. त्यानं अलीकडेच लखनौमध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण केल्याचंही नमूद केलं आणि लोकांना अशा भूमिकांमध्ये त्याची कल्पना करणं इतकं आव्हानात्मक का आहे? असा प्रश्न विचारला.
9/10

तो म्हणाला, "जरी भूमिका गुंडाची किंवा दुसऱ्या कोणाची असली तर मी त्या साच्यात बसणार नाही का?
10/10

नील पुढे म्हणाला, "सैफ अली खान सर ओमकारामध्ये लंगडा त्यागीची भूमिका करू शकतात ना? हृतिक रोशन सरांनी 'ग्रीक गॉड'च्या साच्यातून बाहेर पडून 'सुपर 30' बनवला, बरोबर ना? त्यांना मैदानाबाहेर संधी मिळू शकतात, पण इथे मला प्रयत्न करत राहावे लागतील."
Published at : 06 Mar 2025 01:36 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम




















