एक्स्प्लोर

धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी

कुंभमेळा परिसरात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले असून त्यामुळे प्रयागराजमध्ये मर्यादित भाविकांनाच प्रवेश दिला जात आहे.

प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या धरतीवर शतकातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा प्रयागराजमध्ये (Prayagraj) यंदा मोठ्या उत्साहात आणि भाविकांच्या गर्दीने पार पडला. या कुंभमेळ्यात तब्बल 60 कोटींपेक्षा जास्त भाविकांनी गंगास्नान केल्याची माहिती आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि जगभरातील भाविकांनी येथील गंगा नदीत जाऊन डुबकी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योगपतीही प्रयागराजमध्ये जाऊन भक्तीरसात न्हाऊन आल्याचं पाहायला मिळालं. या महाकुंभमेळ्यातील प्रत्येकाचे अनुभव हे संस्मरणीय आणि आयुष्यभर आठवण देणारे ठरले. गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरच्या घटनेचा अपवाद वगळता महाकुंभमेळा उत्साहात आणि सर्वच अंगानी उल्लेखनीय ठरला. या महाकुंभमेळ्यात हजारो कोटींची उलाढाल झाली असून अगदी लिंबाच्या काडीचे दंतमंजन विकण्यापासून ते अनेक उद्योग पाहायला मिळाले. त्यामध्ये, येथील नाविक म्हणजे होडी चालवणाऱ्या व्यवसायिकांनाही महाकुंभमेळ्याने मोठी कमाई करुन दिली. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी एका नाविक कुटुंबीयांची सक्सेस स्टोरी सांगितली आहे. 

कुंभमेळा परिसरात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासन अधिक सतर्क झाले होते, प्रयागराजमध्ये मर्यादित भाविकांनाच प्रवेश दिला जात होता. त्यामुळे विविध जिल्ह्यातून प्रयागराजमध्ये प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर अनेक किलोमीटरची वाहतूक कोंडी होऊन भाविकांना 8-10 तास जाममध्ये अडकून पडावे लागले. प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून आतापर्यंत 60 कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले असून हा आकडा भुवया उंचावणार आहे. तब्बल 60 कोटी भाविक प्रयागराजमध्ये येऊन गेल्यामुळे तेथे मोठी आर्थिक उलाढाल झाली असून हजारो कोटींचा व्यवसायही झाला आहे. अगदी रुद्राक्षांची माळ विकणारी मोनालिसा, लिंबाची काडी दंतमंजन विकणारा मुलगा ते होडीमधून त्रिवेणी संघम व घाटाचे दर्शन घडवणारे नाविक बांधवांनीही मोठी कमाई केल्याचं पाहायला मिळालं. 

45 दिवसांत 30 कोटी कमावले

कोई भी धंदा छोटा या बडा नही होता, धंदे से बडा कोई धर्म नही होता, हा चित्रपटातील डायलॉग प्रयागराजमधील नाविक कुटुंबाची सक्सेस स्टोरी उलगडणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माहिती देताना येथील एका नाविकाची सक्सेस स्टोरी सांगितली. एका नाविक कुटुंबीयांने 45 दिवसांत 30 कोटी रुपयांची कमाई केल्याचं मुख्यमंत्र्‍यांनी म्हटलं, त्यावेळी सर्वांनी बाक वाजवून दाद दिली. येथील नाविकांचे शोषण होत आहे, त्यांना चांगल्या सुविधा दिल्या जात नाहीत असा आरोप विरोधकांनी केला. मात्र, येथील एका नाविक कुटुंबाने 45 दिवसांत 30 कोटी रुपयांची कमाई केली. या नाविक कुटुंबाकडे 135 नौका (होडी) आहेत. एका नौकेने 45 दिवसांत 23 लाख रुपयांचा गल्ला जमवला. जवळपास 50 ते 55 हजार रुपये प्रतिदिन कमाई या नौकाचालक नाविकांनी केल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. मी 27 फेब्रुवारी रोजी प्रयागराजमध्ये गेलो होतो, तिथे गंगा नदीची पूजा केली, स्वच्छता व आरोग्य सेवकांचा सन्मानही केला. त्यानंतर, नाविकांसोबतही आम्ही संवाद साधला. परिवहन व रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबतही आम्ही उत्तम कार्यक्रम केला होता, अशी माहित योगी आदित्यनाथ यांनी दिली.  

दरम्यान, महाकुंभ मेळ्यात हजारो कोटींची उलाढाल झाली असून लहान सहान उद्योग धंद्यांपासून ते मोठ्या व्यवसायकांनीही मोठी कमाई केली आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्र्‍यांनी सांगितलेली ही सक्सेस स्टोरी अनेकांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा देणारी आहे. 

हेही वाचा

धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget