एक्स्प्लोर
Job News : बँक ऑफ इंडियात 400 जागांवर अप्रेंटिसची संधी, दरमहा 12000 रुपये मिळणार,महाराष्ट्रासाठी किती जागा?
Bank of India Apprentices : बँक ऑफ इंडियामध्ये केंद्र सरकारच्या अप्रेंटिसशिपच्या धोरणानुसार 400 जागा अप्रेंटिससाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.
बँक ऑफ इंडियात अप्रेंटिसची संधी
1/5

केंद्र सरकारच्या अप्रेंटिसशिप कायदा 1961 नुसार बँक ऑफइंडियानं अप्रेंटिसशिपच्या 400 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 मार्चपासून सुरु झाली असून 15 मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम या बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगच्या वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
2/5

एकूण 400 जागांसाठी ही प्रक्रिया राबवली जात असून महाराष्ट्र राज्यासाठी 67 जागा आहेत. मुंबई उत्तर, नागपूर, नवी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, सोलापूर आणि विदर्भ विभागात या जागा असतील.
3/5

अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 20 ते 28 दरम्यान असावं. उमेदवारानं पदवीचं शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलेलं असावं.
4/5

अर्ज मिळाल्यानंतर ऑनलाईन चाचणी आणि स्थानिक भाषा चाचणी द्यावी लागेल. ऑनलाईन चाचणीत सामान्य, आर्थिक जागरुकता, इंग्रजी भाषा, क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग एप्टिट्यूड, संगणक ज्ञान या 100 प्रश्नांची परीक्षा होईल. याशिवाय स्थानिक भाषा परीक्षा देखील होईल.
5/5

अप्रेंटिससाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना बँक ऑफ इंडियाकडून 7500 रुपये आणि केंद्र सरकारकडून 4500 असे एकूण 12000 रुपये स्टायपेंड म्हणून मिळतील. प्रशिक्षण कालावधी 12 महिन्यांचा असेल. अप्रेंटिससाठी दिव्यांगांना 400 रुपये, एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना 600 रुपये तर इतर सर्व अर्जदारांना 800 रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.
Published at : 06 Mar 2025 09:46 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























