Virat Kohli and Steve Smith : स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीही भावूक, मिठी मारत एकमेकांना काय काय म्हणाले? Video
Virat Kohli and Steve Smith : स्टीव्ह स्मिथच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीही भावूक, मिठी मारत एकमेकांना काय काय म्हणाले? Video

Virat Kohli and Steve Smith : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये भारताकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन टीमचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलीये. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या स्टीव्ह स्मिथच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. दरम्यान, निवृत्तीची घोषणा करण्यापूर्वी स्टीव्ह स्मिथने भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला याबाबतची माहिती दिली होती.
The Legend of Virat Kohli 🫂 to Steve Smith👍 #ViratKohli #INDvAUS see 👀 👌 😀 😎 pic.twitter.com/CP5C9kyd56
— S (@TheNameIsShaha) March 5, 2025
दोन विश्वचषक जिंकणाऱ्या टीमचा भाग असणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद - स्टीव्ह स्मिथ
स्मिथने ऑस्ट्रेलियाकडून 170 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने 5800 धावा केल्या आहेत. स्मिथने इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, "एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळणे आणि दोन विश्वचषक जिंकणाऱ्या टीमचा भाग असणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. मला सपोर्ट करणाऱ्या प्रत्येकाचे धन्यवाद...हा माझ्यासाठी एक अद्भुद प्रवास होता.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला स्मिथच्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत अगोदरच माहिती असल्याचं दिसतंय. या व्हिडीओमध्ये कोहली भावुक होऊन स्मिथला मिठी मारताना दिसतोय. यामध्ये विराट स्मिथला विचारतो की, तुम्ही वनडेतील शेवटचा सामना खेळलाय का? स्मिथ या प्रश्नाचं सकारात्मकपणे उत्तर देतोय.
स्टीव्ह स्मिथने 64 एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलंय. यामधील 32 सामने जिंकण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं, तर 24 सामन्यांमध्ये कांगारुंना पराभवाचा सामना करावा लागलाय. स्मिथने 12 शतक आणि 35 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. याशिवाय आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने 28 विकेट्स देखील पटकावल्यात. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त व्यक्तिगत स्कोर करण्यात स्मिथने रिकी पॉटिंगशी बरोबरी केली होती. दोघांनी 164 धावा करत वनडेमध्ये आपली सर्वोकृष्ट कामगिरी केली.
ऑस्ट्रेलियाने 2015 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप जिंकला होता, त्यानंतर 2023 मध्ये भारतात खेळवण्यात आलेल्या विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाने मोहोर उमटवली होती. या दोन्ही विश्वचषकात स्टीव्ह स्मिथने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. स्मिथने बोलताना सांगितले की,अनेक चांगल्या आठवणी आहेत. दोन वेळेस विश्वचषक जिंकलेल्या संघाचा भाग होता आलं. आता 2027 च्या वर्ल्डकपची तयारी सुरु करण्याची वेळ आहे. त्यामुळे मला निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ आहे.
दरम्यान, एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली तरी स्टिव्ह स्मिथ टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहे. टेस्ट क्रिकेटला माझी प्राथमिकता असणार आहे. "मी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि इंग्लंडविरोधात खेळण्यास मी उत्सुक आहे. मला वाटतं की, आता मी पुढील सामन्यात मला चांगलं योगदान देता येईल", असंही स्टीव्ह स्मिथ म्हणालाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या




















