Chhattisgarh Naxal Arrest: छत्तीसगढमध्ये नोटा बदलण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक, बीजापूर पोलिसांची कारवाई
Chhattisgarh Naxal Arrest :अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांकडून सहा लाखांची रोकड, 11 बँक पासबुक आणि सरकारविरोधी नक्षल पत्रकांसह एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे
Chhattisgarh : छत्तीसगढमध्ये दोन हजाराच्या नोटा जमा करण्यासाठी आलेल्या दोन नक्षल्यांना अटक करण्यास यश मिळाले आहे. बीजापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) देशात पुन्हा एकदा नोटबंदी (Demonetisation) जाहीर करण्यात आली. पण यावेळी केवळ 2 हजार रुपयांच्या नोटा (Rs 2000 Notes) चलनातून मागे घेण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या या निर्णयानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. 23 मे पासून नोटा बँकेच्या कोणत्याही शाखेत मिळत आहे.
11 बँक पासबुक, सरकारविरोधी नक्षल पत्रकांसह एक दुचाकी वाहन जप्त
छत्तीसगढच्या बीजापूर पोलिस आणि DRG च्या नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आली आहे. या अटकेत बीजापूरच्या मूलवासी बचाव नेत्याचा ही सहभाग आहे. पोलिसांनी दोन हजाराच्या 6 लाख रुपयासह अटक केली आहे. बीजापूरचे एसपी अंजनेय वार्ष्णेय यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांकडून सहा लाखांची रोकड, 11 बँक पासबुक आणि सरकारविरोधी नक्षल पत्रकांसह एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आली आहे
नाकाबंदी दरम्यान केली कारवाई
नक्षल्यांच्या प्लाटून 10 चा कमांडर मल्लेशकडून दोन हजारांच्या नोटा घेऊन बँकेत 8 लाख रुपये जमा करण्यासाठी दोन नक्षलवादी आले होते. बीजापूर पोलिस आणि DRGने नाकाबंदी दरम्यान ही कारवाई केली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये गजेंद्र मडवी हा सिल्गर आंदोलन आणि मूलवासी बचाव मंचचा नेता आहे तर दुसरा आरोपी लक्ष्मण कुंजम हा नरसापूरचा रहिवासी आहे.
नक्षल्यांच्या प्लाटून 10 चा कमांडर मल्लेशने दिले होते पैसे
पोलिसांनी केलेल्या चौकशीत गजेंद्र मडवी याने कबुल केले आहे की, नक्षल्यांच्या प्लाटून 10 चा कमांडर मल्लेशने दोन हजारांच्या नोटा बदलून आणण्यासाठी आठ लाख रुपये होते. विविध बँकेतून नोटा बदलून आणण्यास सांगितले होते. लक्ष्मण कुंजमच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात 50,000 आणि युनियन बँकेच्या खात्यात 48000 रुपये जमा करण्यात आले होते. तर मडवीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यात 38,000 आणि सेंट्रल बँकेच्या खात्यात 50,000 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती बीजापूरचे एसपी अंजनेय वार्ष्णेय यांनी दिली.
30 सप्टेंबरपर्यंत बदलता येणार नोटा
आरबीआयने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या असल्या तरी या नोटांचा वापर 30 सप्टेंबरपर्यंत करता येणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बँकेच्या मार्फत बदलता येणार आहेत. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील अशांना नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे.
हे ही वाचा :