Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
विराट कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला.

Virat Kohli India vs Australia Champions Trophy Semi-Final : विराट कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. हा सलग चौथा आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना असेल ज्यामध्ये मेन इन ब्लू खेळणार आहे. 264 धावांचा पाठलाग करताना, भारताने पॉवरप्लेमध्ये सुरुवातीच्या दोन विकेट गमावल्या. शुभमन गिल 11 चेंडूत 8 धावा काढून बाद झाला. तर रोहित शर्माने 29 चेंडूत 28 धावा केल्या, तरीही नशिबाने दोन झेल सोडले. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी त्यांचा उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि 91 धावांची भागीदारी करून भारताला पुन्हा एकदा ट्रॅकवर आणले. नंतर हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांनी सामना संपवला. या सामन्यात पुन्हा एकदा भारताच्या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला. ज्यामुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
One Step Closer to 🏆
— BCCI (@BCCI) March 4, 2025
Clinical #TeamIndia overcome Australia by 4 wickets and book their spot in the final 👊
Scorecard ▶️ https://t.co/HYAJl7biEo#INDvAUS | #ChampionsTrophy pic.twitter.com/rFYYEd70VC
शुभमन गिल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने हळूहळू आपला डाव पुढे नेला आणि संघाला सामन्यात ठेवले. कोहलीने श्रेयस अय्यरसोबत एक शानदार भागीदारी केली आणि शतक ठोकण्याच्या उंबरठ्यावर असताना तो अचानक शॉट मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पण, त्याच्या 86 धावांच्या खेळीने भारताचा विजय निश्चित झाला होता.
ऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर काय म्हणाला विराट कोहली?
सामनावीराचा पुरस्कार जिंकल्यानंतर कोहली म्हणाला की, 'हा सामना पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या दिवसाच्या सामन्यासारखाच होता. परिस्थिती समजून घेणे आणि स्ट्राइक बदलत रहाणे. कारण या खेळपट्टीवर भागीदारी महत्त्वाची आहे. हे सर्व परिस्थितीवर अवलंबून असते आणि मग मी माझा डाव खेळतो. माझा वेळ, खेळपट्टीवरचा माझा संयम, मला घाई नव्हती. हा खेळ पूर्णपणे दबावाचा आहे. जर तुम्ही खेळपट्टीवर जास्त वेळ टिकला तर विरोधी संघ सहसा हार मानतो. त्यावेळी आवश्यक धावगती कितीही असली तरी मला काही फरक पडत नाही.
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...'
सध्या तू तुझ्या एकदिवसीय क्रिकेटच्या करिअरमधील सर्वोत्तम खेळ खेळत आहे, असं तुला वाटतंय का? असा प्रश्न विराट कोहलीला विचारण्यात आला. यावर बोबलताना "मला याबाबत काही माहिती नाही. मी ते लोकांवर सोडलेलं आहे. मी अशा गोष्टींकडे लक्ष केंद्रीत केलेलं नाही. या याबबत कधी बोलतही नाही. विजयाच्या मार्गावर असे टप्पे येतच असतात. माझ्या संघाला जे हवंय ते करण्यातच मला अभिमान वाटतो. अन्य गोष्टी माझ्यासाठी आता फारशा महत्त्वाच्या नाहीत," असं विराट कोहली म्हणाला.
विराटचे हुकले शतक
पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावणारा विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धही शतक झळकावू शकला असता, पण त्याने चुकीचा शॉट खेळला. मात्र, या खेळीने विराट कोहलीने अनेक विक्रम मोडले. आयसीसी नॉकआउट सामन्यांमध्ये 1000 धावा करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. तो आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत सर्वाधिक 24 अर्धशतकांपेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू बनला आणि सचिनचा विश्वविक्रम मोडला.

















