एक्स्प्लोर

अशोक सराफ, वंदना गुप्तेंची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर; 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Ashi Hi Jamwa Jamwi Marathi Movie: अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. आगामी चित्रपट 'अशी ही जमवा जमवी'चं पोस्टर प्रदर्शित

Ashi Hi Jamwa Jamwi Marathi Movie: चित्रपट आणि प्रेमकथा हे आपलं आवडतं समीकरण. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला लवकरच अनुभवायला मिळणार आहे. राहुल शांताराम यांच्या 'राजकमल एंटरटेनमेंट' (Rajkamal Entertainment) द्वारे प्रस्तुत, लोकेश गुप्ते (Lokesh Gupte) लिखित आणि दिग्दर्शित, महाराष्ट्र भूषण पद्मश्री अशोक सराफ (Ashok Saraf) आणि वंदना गुप्ते (Vandana Gupte) अभिनीत नवा मराठी चित्रपट 'अशी ही जमवा जमवी' (Ashi Hi Jamwa Jamwi) लवकरच आपल्या भेटीला येत आहे. त्याची दमदार घोषणा काही काळापूर्वी झाली होती, आजच या सिनेमाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. नव्या दमाच्या तसंच अनुभवी कलाकारांचं मिश्रण असलेल्या या चित्रपटाचं लक्षवेधी पोस्टर पाहून अतिशय खुमासदार आणि मनोरंजक अशा या गोष्टीबद्दल प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झालेली आहे.

विशेष म्हणजे, अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. त्यांना ओमकार कुलकर्णी व तनिष्का विशे या नवीन जोडीसह सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर अशा लोकप्रिय कलाकारांची साथ लाभलेली आहे. 'थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी', अशी ही अनोखी गोष्ट लोकेश गुप्ते आपल्यासमोर घेऊन येत आहेत.

संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव, राहुल शांताराम यांनी मनोरंजन विश्वात काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केलेली आहे.

सिनेमाच्या आकर्षक शीर्षकावरून रंजक कथेची कल्पना येते. आता ही जमवा जमवी नक्की कसली, कोणाची आणि कशाप्रकारे होणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे; जे 10 एप्रिल 2025 रोजी कळेलच, कारण याच दिवशी ‘राजकमल एंटरटेनमेंट’चा हा नवाकोरा चित्रपट आपल्या जवळच्या सिनेमागृहात आपल्या भेटीला येणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

तलावात सापडलेल्या मुंडक्याभोवती फिरते पटकथा, सुरू होताच 5 मिनिटांत जबरदस्त सस्पेन्स; डोक्याच्या चिंध्या करतो मिस्ट्री फिल्मचा क्लायमॅक्स

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sindhudurg BJP : महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
महायुतीचा जागा वाटप फॉर्म्युला जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपमध्ये बंडाचे निशाण; 43 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, ZP निवडणुकीआधीच असंतोष
Nagpur Results 2026: '...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
'...तर तुम्ही मुस्लिमांमध्ये आणखी 100 नेते निर्माण कराल'; नागपूर दंगलीतील मुख्य आरोपीचा भाजपला इशारा, फहीम खानच्या पत्नीसह MIMचे सहा उमेदवार विजयी
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप
Embed widget