एक्स्प्लोर

Morning Headlines 12th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यात अवकाळी बरसणार

Maharashtra Weather Update : आज लक्ष्मीपूजनाच्या (Laxmi Pujan) मुहूर्तावरही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा या ठिकाणी काही भागात शनिवारीही पाऊस झाला, तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. वाचा सविस्तर...

PM Modi : पंतप्रधानांकडून देशवासियांना दिपावलीच्या शुभेच्छा, सीमेवर जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

PM Modi Diwali Celebration with Indian Army : आज दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटर म्हणजेच X मीडियावर पोस्ट करत लिहिलं आहे की, "देशातील आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना दिवाळीच्या शुभेच्छा. हा विशेष सण तुमच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो." वाचा सविस्तर...

Gold Silver Price Today : दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं झालं स्वस्त, सोने-चांदीचा आजचा दर जाणून घ्या

Gold Silver Price Today : आज दिवाळीचा (Diwali 2023) पहिला दिवस आहे. सणासुदीच्या काळात सातत्याने घसरण झाल्यानंतर आता सोन्याचे भाव आज स्थिरावले आहेत. रविवारी, 12 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर चांदीची किंमत प्रति किलो 73000 रुपये आहे. कर आणि उत्पादन शुल्कामुळे सोन्या-चांदीची किंमत दररोज चढ-उतार होत असतो. आज सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत. वाचा सविस्तर...

India vs Netherlands : भारत-नेदरलँड्स लढत! टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळणार

IND vs NED, World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये (ICC ODI World Cup 2023) आज भारत विरुद्ध नेदरलँड्स (India vs Netherlands) यांच्यात सामना रंगणार आहे. विश्वचषक 2023 (World Cup 2023) च्या शेवटच्या साखळी सामन्यात भारत आणि नेदरलँड संघ आज आमने-सामने येणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकात आतापर्यंत टीम इंडियाची (Team India) विजयी वाटचाल पाहायला मिळाली आहे. सलग आठ सामन्यात भारताने विजय मिळवल आहे. आजच्या सामन्यात नवव्या विजयासह दिवाळी सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. बंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज दुपारी 2 वाजता हा सामना रंगणार आहे. वाचा सविस्तर...

12 November In History : पंतप्रधान असताना इंदिरा गांधींची काँग्रेसमधून हकालपट्टी, 'गब्बर सिंह' अमजद खान यांचा जन्म; आज इतिहासात

12th November In History : आजचा दिवस भारतीय राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 1969 साली इंदिरा गांधी (Indira Gandhi) या पंतप्रधान असताना त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांनी विरोधी अपक्ष उमेदवार, व्ही व्ही गिरी यांना त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीत मदत करून निवडून आणलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी इंदिरा गांधी यांची पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदावरून हकालपट्टी केली होती. त्याचसोबत पक्षीप्रेमी डॉ. सलीम अली यांचा जन्म आजच्याच दिवशी झाला होता. वाचा सविस्तर...

Lakshmi Pujan 2023 : धन-धान्याची बरकत करणारा दिवस म्हणजेच 'लक्ष्मीपूजन'; वाचा लक्ष्मीपूजनाची प्रथा आणि परंपरा

Lakshmi Pujan 2023 : दिवाळी (Diwali 2023) लक्ष्मीपूजन (Lakshmi Pujan) ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते. यावर्षी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर म्हणजेच आज केलं जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. याच संदर्भात अधिक माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे. वाचा सविस्तर...

Horoscope Today 12 November 2023 : आज नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन! दिवाळी कोणत्या राशींसाठी शुभ असणार? आजचे राशीभविष्य जाणून घ्या 

Horoscope Today 12 November 2023 : आज नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन! राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 12 नोव्हेंबर 2023 रोजी रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज देशभरात दिवाळीचा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी, गणेश आणि कुबेर महाराज यांची पूजा करण्याची परंपरा आहे. सर्व राशीच्या लोकांसाठी रविवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget